शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात फोकस मराठवाडा, दहा जागांचे भवितव्य ठरणार १८ एप्रिलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 04:55 IST

दिग्गजांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणाºया दुसºया टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान १८ एप्रिलला होणार आहे.

मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, खा. प्रीतम मुंडे, खा. आनंदराव अडसूळ आदी दिग्गजांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणाºया दुसºया टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान १८ एप्रिलला होणार आहे. राज्याच्या १० मतदारसंघातील या निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे.अमरावती, सोलापूर आणि लातूर या तीन जागा अनुसूचित जातींसाठी राखीव असून, सध्या त्या शिवसेना व भाजपच्या ताब्यात आहेत. बीडमध्ये प्रीतम मुंडे तर अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा या दोन प्रमुख महिला उमेदवार आहेत. दहापैकी तीन जागा विदर्भातील, सहा जागा मराठवाड्यातील असून, एक पश्चिम महाराष्ट्रातील आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहापैकी सात जागांची निवडणूक झाली. त्यामुळे फोकस विदर्भावर होता. आता दुसºया टप्प्यात मराठवाड्यावर फोकस असेल. मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत.दुसºया टप्प्यातील दहा जागांपैकी सध्या भाजप-शिवसेनेचे नऊ ठिकाणी खासदार आहेत, तर नांदेडची एकच जागा काँग्रेसकडे आहे. नऊ जागा टिकविण्याचे आव्हान युतीसमोर असेल, तर ताकद वाढल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान हे महाआघाडीसमोर असेल.युतीचा विचार करता शिवसेना पाच (अमरावती, बुलडाणा, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली) तर भाजप पाच (अकोला, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर) जागा लढत आहे. महाआघाडीचा विचार करता काँग्रेस अकोला, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर या पाच जागा लढत असून, बुलडाणा, परभणी, बीड, उस्मानाबाद या चार जागा राष्ट्रवादी लढत आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील अमरावतीच्या जागेवर युवा स्वाभिमानीच्या नवनीत कौर राणा लढत आहेत. गेल्या वेळी त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या.वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघांतून लढत असून दोन्ही ठिकाणी १८ एप्रिलला मतदान होत आहे. २०१४ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या दोन्ही जागांसाठी (नांदेड, हिंगोली) या टप्प्यात मतदान होत आहे.>दुरंगी, तिरंगी सामनादहापैकी लातूर, नांदेड या दोन ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. अकोला आणि नांदेडमध्ये भाजप, काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडी असा तिरंगी सामना आहे. बुलडाणा, परभणी, उस्मानाबादमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. बीडमध्ये भाजप-राष्ट्रवादी असा सामना आहे. अमरावतीत शिवसेना विरुद्ध महाआघाडीच्या नवनीत राणा कौर (युवा स्वाभिमान) अशी चढाओढ आहे. हिंगोलीत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने आहेत. या दहापैकी किमान चार ठिकाणी बहुजन वंचित आघाडीने चांगले आव्हान दिले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक