शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील सम-विषम योजना तूर्त स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 19:39 IST

दिल्लीतील दाट धुक्याच्या समस्येवरील तोडगा म्हणून वाहनांसाठी जाहीर केलेली सम-विषम योजना आम आदमी पार्टीच्या सरकारने मागे घेतली आहे. सोमवारपासून ही योजना अमलात येणार होती. तथापि, या योजनेत ‘फक्त महिलां’साठी धावणाºया वाहनांसह अन्य काही वाहनांना देण्यात आलेली सूट राष्टÑीय हरित लवादाने रद्द केल्यामुळे सरकारने ही योजनाच स्थगित केली आहे.

ठळक मुद्देकेजरीवाल सरकारचा निर्णय : काही वाहनांना दिलेली सूट हरित लवादाकडून रद्द

नवी दिल्ली : दिल्लीतील दाट धुक्याच्या समस्येवरील तोडगा म्हणून वाहनांसाठी जाहीर केलेली सम-विषम योजना आम आदमी पार्टीच्या सरकारने मागे घेतली आहे. सोमवारपासून ही योजना अमलात येणार होती. तथापि, या योजनेत ‘फक्त महिलां’साठी धावणाºया वाहनांसह अन्य काही वाहनांना देण्यात आलेली सूट राष्टÑीय हरित लवादाने रद्द केल्यामुळे सरकारने ही योजनाच स्थगित केली आहे.दिल्लीचे वाहतूकमंत्री कैलाश गहलोत यांनी या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या योजनेत दुचाकी वाहने, तसेच फक्त महिलांसाठी धावणाºया वाहनांना सूट देण्यात आली होती. या सवलतीला हरित लवादाने आक्षेप घेतला आहे. आपत्कालीन वाहने वगळता अन्य सर्व वाहनांची सूट रद्द करण्याचे निर्देश लवादाने दिले आहेत. आम्ही लवादाचा आदर करतो. तथापि, सरकार महिलांच्या सुरक्षेशी तडजोड करू शकत नाही. आम्ही कुठलीही जोखीम पत्करू शकत नाही. दुचाकी वाहनांची सूट रद्द करण्याची अटही आम्ही स्वीकारू शकत नाही. कारण एवढ्या बसगाड्या आमच्याकडे नाहीत, त्यामुळे तूर्त आम्ही ही योजना मागे घेत आहोत. सोमवारी आम्ही लवादासमोर नवा अर्ज सादर करू.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सम-विषम योजना मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कैलाश गहलोत, गोपाल राय आणि इम्रान हुसैन यांच्यासह आप सरकारमधील मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. 

काय आहे सम-विषम योजनादिल्लीत सध्या दाट धुके पडले असून, मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यावर तोडगा म्हणून सरकारने १३ ते १७ नोव्हेंबर या काळात सम-विषम योजना आणली होती. सम तारखेला सम क्रमांकाच्या, तर विषम तारखेला विषम क्रमांकाच्या वाहनांनाच दिल्लीच्या रस्त्यावर धावण्याची परवानगी त्यात मिळणार होती. रविवारपर्यंत शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.