शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण भारतातल्या 131 जागांपैकी भाजपाला मिळणार फक्त 17, काँग्रेसच्या जागांमध्ये चारपट वाढ- सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 09:52 IST

न्यूज चॅनल टाइम्स नाऊनं व्हीएमआरबरोबर मिळून केलेल्या सर्व्हेतून भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ठळक मुद्दे भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण भारतातल्या 131 लोकसभेच्या जागांपैकी भाजपाला फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागू शकतंकाँग्रेसला दक्षिण भारतात 2014च्या तुलनेत चौपट जागा (71) मिळतील, असाही अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक 2019च्या निकालासंदर्भात न्यूज चॅनल टाइम्स नाऊनं व्हीएमआरबरोबर मिळून केलेल्या सर्व्हेतून भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण भारतातल्या 131 लोकसभेच्या जागांपैकी भाजपाला फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागू शकतं, अशी शक्यता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं केलेल्या सर्व्हेतून व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसला दक्षिण भारतात 2014च्या तुलनेत चौपट जागा (71) मिळतील, असाही अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे.जानेवारीमध्येच हा सर्व्हे करण्यात आला असून, या सर्वेक्षणातून वेगवेगळ्या राज्यांतील निकालासंदर्भात अंदाज वर्तवण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत. तिथे आता निवडणुका झाल्यास काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला मोठा फायदा पोहोचू शकतो. यूपीए 39पैकी 35 जागांवर विजय मिळवेल, अशीही शक्यता व्यक्त केली आहे. तर एआयएडीएमके चार जागांवर विजय मिळवेल, असं चित्र आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला इथे खातंही उघडता येणार नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेनं 37 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांना खातंही उघडता आले नव्हते. भाजपा युती आणि इतरांच्या खात्यात 1-1 जागा गेली होती.केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहेत. जर आता निवडणुका झाल्यास भाजपाचं खातं उघडू शकते. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ 16 जागांवर विजय मिळवेल. कम्युनिस्टांना तीन जागा राखण्यात यश येईल. 2014च्या लोकसभा निवडणुकीत यूडीएफनं 12 जागा जिंकल्या होत्या. एलडीएफनं 8 जागांवर विजय मिळवला होता. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. जर आज निवडणूक लागल्यास वायएसआर काँग्रेस 23 जागांवर विजय मिळवेल. तेलुगू देसम पार्टी फक्त 2 जागा जिंकेल. इथे भाजपा आणि काँग्रेसला खातं उघडणंही अवघड आहे. 2014च्या निवडणुकीत टीडीपीनं 15 जागा जिंकल्या होत्या. तर वायएसआर काँग्रेसनं 8 जागांवर विजय मिळवला होता. भाजपानं 25 पैकी फक्त दोन जागा मिळवल्या होत्या.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी