शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Sharad Pawar : काळजी करू नका, सरकार पाच वर्षे टिकेल : शरद पवार

By अतुल कुलकर्णी | Updated: June 11, 2021 06:52 IST

Sharad Pawar : पवार म्हणाले, महाराष्ट्रात आपण एका वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे. कधी कोणाला वाटलेही नव्हते की शिवसेना आणि आपण एकत्र काम करू. पण आपण पर्याय दिला आणि सुदैवाने हा पर्याय लोकांनीही स्वीकारला.

- अतुल कुलकर्णी

मुंबई : शिवसेनेसोबत कधी सरकार बनवू असे आपल्याला वाटले नव्हते. मात्र, महाराष्ट्रात आपण वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले. हे सरकार किती दिवस टिकेल याविषयी शंका उपस्थित केल्या जात असल्या तरी हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल, आणि पुढेही लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळवेल, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.

राष्ट्रवादी पक्षाच्या २२व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. निवडक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबईत पार पडला. पवार म्हणाले, महाराष्ट्रात आपण एका वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे. कधी कोणाला वाटलेही नव्हते की शिवसेना आणि आपण एकत्र काम करू. पण आपण पर्याय दिला आणि सुदैवाने हा पर्याय लोकांनीही स्वीकारला.

तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी योग्य दिशेने पावले टाकत सरकार चालवले आहे. जेव्हा हे सरकार स्थापन झाले, त्यावेळी माध्यमांनी हे सरकार किती महिने, किती दिवस टिकेल यावरून चर्चेचे गुऱ्हाळ चालवले. परंतु सरकारने दोन वर्षांचा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केला. 

शिवसेनेसोबतचा अनुभव विश्वासाचा  शिवसेनेसोबतचा माझा यापूर्वीचा अनुभव विश्वासाचा आहे. देशात जनता पक्षाचे राज्य येऊन गेल्यानंतर देशात ठिकठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेला असताना, शिवसेना हा एकमेव पक्ष काँग्रेसला मदत करण्यासाठी पुढे आला आणि विधानसभा निवडणूक शिवसेनेने लढविली नाही.  बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता, आणि त्या शब्दाला ते जागले. त्या कालखंडात शिवसेनेने जी भक्कम भूमिका घेतली, त्या भूमिकेला सोडण्याची वागणूक आता होईल असे वाटणारे वेगळ्या नंदनवनात वावरत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

 मोदी-ठाकरे भेटीबद्दल...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा संदर्भ देत ते म्हणाले, की राज्यातल्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले. त्यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची व्यक्तिगत भेट झाली. त्यानंतर पुन्हा वावड्या उठवणे सुरू झाले. कोणी काही म्हणो, अशा चर्चांचा यत्किंचितही विचार करण्याची गरज नाही. कारण हे सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तिघांचे आहे.

सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर ती भ्रष्ट होतेमराठा आरक्षण असेल किंवा ओबीसींचा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जागेचा गंभीर प्रश्न असेल ते आपल्याला सोडवावेच लागतील. सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर ती भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे आणि हे सूत्र आपल्याला मान्य असेल तर एसी, एसटी आणि ओबीसी असतील त्यातल्या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे, हे वाटले पाहिजे याची काळजी आपण घेऊया.

शिवभोजनचे कौतुकशिवभोजन थाळी योजनेचा आवर्जून उल्लेख करीत यामुळे कितीतरी गोरगरिबांच्या जेवणाची लॉकडाऊनच्या काळात सोय झाली, असे शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस