शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

नरेंद्र मोदी नावाचा फुल फॉर्म माहित्येय का?; भाजपा खासदार सुशील मोदींनी राज्यसभेत सांगितला...

By प्रविण मरगळे | Updated: February 11, 2021 10:16 IST

PM Narendra Modi Name Full Form: सुशील मोदी यांनी भाषणात नरेंद्र मोदींचं खूप कौतुक केले. कोरोना संकटकाळात अनेक लोकांची मदत केली गेली असं ते म्हणाले.

ठळक मुद्देअर्थव्यवस्थेच्या नुकसानीतून देश पुन्हा सावरू शकतो, परंतु आयुष्य गेलं तर पुन्हा परत आणू शकत नाही १९९७ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या भाषणानंतर सेन्सेक्सने शिखर गाठलं होतंमागील २५-३० वर्ष बजेट पाहतोय, यंदाच्या अर्थसंकल्पावर कोणीही टीका केली नाही. देशाने स्वागत केले

दिल्ली – राज्यसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेवेळी खासदार सुशील मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा अर्थ सांगितला. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार सुशील मोदी संसदेत भाषण करताना विरोधकांना टोला लगावला.

नरेंद्र मोदी नावाचा पूर्ण अर्थ सुशील मोदींनी सांगितला(BJP MP Explained full form of Narendra Modi Name) 

N- New India

A- Aatm Nirbhar Bharat

R- Ready for reforms

E- Electronic Agri market

N- New Financial Structure

D- Disinvestment

R- Railway and roads

A- Agriculture Reforms

 

M- MSP assured, Helping migrant worker

O - One person company

D- Down to earth

I- Inclusive development

सुशील मोदी यांनी भाषणात नरेंद्र मोदींचं खूप कौतुक केले. सुशील मोदी म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या नुकसानीतून देश पुन्हा सावरू शकतो, परंतु आयुष्य गेलं तर पुन्हा परत आणू शकत नाही असं पंतप्रधानांनी सांगितले. महाभारताच्या शांतिपर्वात म्हटलंय की, ‘आपदाग्रस्त जीव प्राण रक्षा ही धर्म है’ केंद्र सरकार याच गोष्टीचं पालन करते, कोरोना संकटकाळात अनेक लोकांची मदत केली गेली असं ते म्हणाले.

तसेच केंद्राने मांडलेल्या अर्थसंकल्पाचं शेअर मार्केटनेही स्वागत केले, सर्वाधिक ५१ हजारपर्यंत सेन्सेक्स वधारलं होतं, २३ वर्षानंतरही असं झालं, १९९७ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या भाषणानंतर सेन्सेक्सने शिखर गाठलं होतं, त्याचसोबत मागील २५-३० वर्ष बजेट पाहतोय, यंदाच्या अर्थसंकल्पावर कोणीही टीका केली नाही. देशाने स्वागत केले. लॉकडाऊन काळात मोदी सरकारने ८० कोटी गरिबांना ४० किलो धान्य आणि ८ किलो डाळ दर महिन्याला दिली. २० कोटी महिलांचे जनधन खाते उघडण्यात आले. ७ कोटींहून अधिक महिलांना उज्ज्वला कनेक्शनअंतर्गत गॅस सिलेंडर दिला असंही सुनील मोदींनी सांगितले.

अमेरिकेपेक्षा भारताचं काम चांगले

अमेरिकेत योजनांचा थेट फायदा होत नव्हता, ८ कोटी लोकांचे चेक प्रिंट केले, त्यानंतर ट्रम्प यांनी सही केली आणि पुढील ४ महिनेही त्या चेकचं वाटप करता आलं नाही. तर दुसरीकडे भारतातील लोकांना लाभ थेट त्यांच्या जनधन खात्यात वेळोवेळी मिळत होता. त्याशिवाय लॉकडाऊन काळात मोदी सरकारने केलेल्या कामाचं कौतुक सुशील मोदींनी राज्यसभेत केले.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभा