शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

पूरक्षेत्रामधील बांधकामांना परवानगी देऊ नका, अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची स्पष्ट सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 07:24 IST

Uddhav Thacekeray: यापुढे ब्लू आणि रेड लाइनच्या आतील बांधकामांना परवानगी देऊ नये, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोल्हापूर : निसर्गातील बदलांमुळे येणाऱ्या वारंवार अस्मानी संकटातून वाचायचे असेल तर यापुढील काळात ठोस कृती आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार प्रयत्न करील. महापूर येण्यास पूरक्षेत्रातील अतिक्रमणे, अवैध बांधकामे कारणीभूत आहेतच. त्यामुळे यापुढे ब्लू आणि रेड लाइनच्या आतील बांधकामांना परवानगी देऊ नये, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कृती आराखडा झाल्यावर त्याला गती दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.शिरोळ व कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागांना शुक्रवारी भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांना धीर देत सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. शासकीय विश्रामधामावर मुख्यमंत्री म्हणाले, वडनेरे, गाडगीळ समित्यांपासून अन्य समित्यांचे आतापर्यंत जे अहवाल सादर झाले, त्यांतील महत्त्वाच्या शिफारशी एकत्रित करून त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहील. या अहवालांचे एकत्रीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. हे मुद्दे लोकांसमोर आले पाहिजेत.  महापूर रोखण्यासाठी वेगवेगळे पर्याय सुचविले जातात. तसाच भिंत घालण्याचा पर्याय पुढे आला होता. मी त्या वेळी हा एक पर्याय असू शकतो, एवढेच म्हटले होते. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय नाही किंवा मला भिंत बांधायचीच आहे, असेही नाही. लोकांचा आक्षेप असेल तर आम्हीही या पर्यायाचा विचार करणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्या - मी पॅकेज देणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे. त्यात दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. - विमा कंपन्यांनी महसूल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून तातडीने ५० टक्के रक्कम द्यावी व व्यापाऱ्यांना या संकटात उभे राहण्यासाठी कमी व्याजदराने बँकांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही ठाकरे म्हणाले.

फडणवीसांनाही बैठकीचे आवताण : मुख्यमंत्री आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. मी, देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितले की, मुंबईत या. आपण बैठक घेऊन चर्चा करू. जर सगळेच प्रमुख पक्ष सोबत असतील तर असा आराखडा तयार करताना आणि त्याची अंमलबजावणी करताना कसल्याच अडचणी येणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कौतुक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापुराच्या अगोदरच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अलमट्टीचे पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. त्याचा चांगला उपयोग झाला; अन्यथा कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले असते, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfloodपूरMaharashtraमहाराष्ट्र