शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

चिराग पासवान यांना मोठा धक्का, LJPबाबत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर कोर्टाने दिला असा निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 19:49 IST

Chirag Paswan News: चिराग पासवान यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकजनशक्ती पार्टीबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती. मात्री ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना न्यायालयीन लढाईत मोठा धक्का बसला आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकजनशक्ती पार्टीबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती. मात्री ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला फसवल्यामुळे पशुपती पारस यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे चिराग पासवान यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. मात्र ही याचिका आता फेटाळली गेली आहे. (Delhi high court dismissed Chirag Paswan petition against Lok Sabha speakers decision )

पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने पशुपती पारस हे लोकजनशक्ती पार्टीचे सदस्य नाही आहेत, असा दावा चिराग पासवान यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पशुपतीनाथ पारस यांच्या गटाला मान्यता दिी होती, त्या निर्णयाला चिराग पासवान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र त्यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

पक्षविरोधी कारवाया आणि वरिष्ठ नेतृत्वाची फसवणूक केल्याने लोकजनशक्ती पक्षामधून पशुपती पारस यांना पक्षातून बाहेर काढले होते. ते आता पक्षाचे सदस्य नाही आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकूण ७५ सदस्य आहेत. त्यातील ६६ सदस्य आमच्याकडे आहेत, असा दावा चिराग पासवान यांनी याचिकेमधून केला होता.

दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या वकिलांनी सांगितले की, त्यांनी लोकसभा अध्यक्षांशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आले की या प्रकरणावर ते लक्ष देत आहेत. यावेळी वकिलांनी सर्वोच्च न्यालायलच्या एका निकालाचाही दाखला दिला. त्यानंतर याबाबत लोकसभा अध्यक्ष लक्ष देत असल्याने कोर्टाने याप्रकरणी कुठलाही आदेश आम्ही देऊ शकत नाही, असे सांगितले. तर लोकसभा अध्यक्षांच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात स्वत: लोकसभा अध्यक्ष लक्ष देत असल्याने या याचिकेचे औचित्य उरत नाही. चिराग पासवान यांच्या वकिलांनीही याला विरोध केला नाही.

तर पशुपती पारस यांच्यावतीने हजर झालेल्या वकिलांनी सांगितले की, जे पत्र पारस यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले आहे त्यावेळी पारस हे चिफ व्हिप होते. तसेच नंतर त्यांची नेतेपदी निवड झाली. तेव्हा कोर्टाने सांगितले की ही याचिका मेंटिनेबल नाही. तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेले पाहिजे. 

टॅग्स :Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीPoliticsराजकारणom birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय