शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: विरोधी पक्षांचे धोरण हे काेलांटउड्या मारणारे, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 05:43 IST

Corona Virus: सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यांचा  उल्लेख करून रविशंकर प्रसाद यांनी आरोप केला की, “विरोधी पक्ष महिनाभरात आपली भूमिका बदलत आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कोरोना विषाणूवरील लस घेतली का, असा प्रश्न संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी विचारला, तर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कोरोना महामारीविरोधातील लढाईत विरोधी पक्षांचे धोरण हे काेलांटउड्या मारणारे आहे, असा आरोप केला. ते म्हणाले, लसीकरण मोहिमेत होईल तेवढे अडथळे ते निर्माण करीत आहेत. 

सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यांचा  उल्लेख करून रविशंकर प्रसाद यांनी आरोप केला की, “विरोधी पक्ष महिनाभरात आपली भूमिका बदलत आहेत. लसीकरण मोहिमेला खीळ घालण्याच्या एकमेव उद्देशाने विरोधी पक्ष राजकारण करीत आहेत हे यातून दिसते.” १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचे ठरवले तेव्हा आरोग्य हा विषय राज्य सरकारांचा असल्याचा आणि राज्यांना लस प्राप्त करून घेऊन त्या वितरित करण्याची मुभा दिली जायला हवी असा विशिष्ट राग आळवला गेला.

विरोधकांनी मग भूमिकाच बदलली    प्रसाद यांनी म्हटले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी असे सुचविले होते की,  भारताची रचना ही संघराज्याची असून, आरोग्य हा राज्यांचा विषय आहे, त्यामुळे केंद्र सरकार त्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.    १२ मे रोजी सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसी या केंद्र सरकारने प्राप्त केल्या पाहिजेत, असे पत्र लिहिले होते.

प्रल्हाद जोशी म्हणाले...प्रल्हाद जोशी म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी लस घेतलेली नाही. त्यांचा भारतीय लसीवर विश्वास नाही. आम्ही गेल्या जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात केली तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित केले होते. आता मात्र ते लस घेत आहेत.”  

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादcorona virusकोरोना वायरस बातम्या