शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: ‘फायझर’, ‘मॉडर्ना’चा राज्यांना लसपुरवठा करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 07:40 IST

Corona Vaccine Update: फायझर आणि मॉडर्नाच्या लसींना अमेरिकेसह काही देशांनी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारताने लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात अमेरिका, ब्रिटनसह डब्ल्यूएचओने मंजुरी दिलेल्या लसींना तत्काळ परवानगी देण्याचे धोरण अवलंबिले आहे.

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरणात सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या ‘फायझर’ आणि ‘मॉडर्ना’ या दोन बड्या कंपन्यांनी लस पुरविण्यास तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यांनी केवळ केंद्र सरकारलाच लसपुरवठा करण्याची अट ठेवली आहे. त्यामुळे राज्य सरकारांना या लसींची थेट खरेदी करता येणार नाही. फायझर आणि मॉडर्नाच्या लसींना अमेरिकेसह काही देशांनी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारताने लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात अमेरिका, ब्रिटनसह डब्ल्यूएचओने मंजुरी दिलेल्या लसींना तत्काळ परवानगी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याअंतर्गत रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीला मंजुरीही देण्यात आली असून या लसीची सध्या आयातही सुरू झालेली आहे. राज्यांना केंद्र सरकारने थेट लस खरेदीसाठी परवानगी दिली आहे. मात्र, या कंपन्यांनी राज्यांना पुरवठा करण्यास नकार दिला आहे. मॉडर्नाने कंपनीच्या धोरणांचा दाखला देऊन केवळ केंद्र सरकारलाच लसपुरवठा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत पुरवठा करणे शक्य नसल्याचेही कंपनीने केंद्र सरकारला स्पष्ट केले आहे. फायझरने नुकसानभरपाईची अट शिथ‍िल करण्याची मागणी केली होती. त्यावरून कंपनीसोबत केंद्र सरकारच्या वाटाघाटी सुरू आहेत. हा तिढा सुटण्याच्या मार्गावर   

असून पुरवठ्याशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात लस टंचाईमुळे लसीकरणाची गती कमी झाली आहे. त्यातच राज्यांना थेट लस खरेदी करण्यासाठीही अडचणी असल्यामुळे लस टंचाईची समस्या कायम आहे.राज्यांना पुरवठ्यास नकारपंजाब आण‍ि दिल्ली सरकारने लस खरेदीसाठी थेट संपर्क केला होता. पंजाब सरकारने फायझर, मॉडर्ना, स्पुतनिक-व्ही आणि जॉन्सन ॲण्ड जॉन्सन या कंपन्यांना पत्र पाठविले होते. मात्र, केवळ मॉडर्नाकडून उत्तर मिळाले आहे. कंपनीने पुरवठ्यास नकार दिला आहे. फायझर आणि मॉडर्नानेही दिल्ली सरकारला थेट लस विक्री करण्यास नकार दिला आहे. तर फायझरने पंजाबला नकार क‌‌‌ळवला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत ही माहिती दिली. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने लस आयात करून राज्यांना पुरवठा करण्याची मागणीही केजरीवाल यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस