शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

महिन्याला ६० लाख डोस द्या, ३ महिन्यात सर्वांचं लसीकरण पूर्ण करतो; केजरीवालांनी मोदींना रोखठोक सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 7:32 PM

Corona Virus Updates Delhi: दिल्लीतील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारसमोर रोखठोक प्रस्ताव ठेवला आहे.

Corona Virus Updates Delhi: दिल्लीतील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारसमोर रोखठोक प्रस्ताव ठेवला आहे. केजरीवाल यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून राजधानी दिल्लीतील सध्याच्या लसीकरणाचं वास्तव मांडलं आहे. दिल्लीला सध्या महिन्याला ६० लाख कोरोना विरोधी लसींची गरज आहे. या गरजेनुसार पुरवठा होत राहिला तर येत्या तीन महिन्यात दिल्लीतील सर्वांचं लसीकरण पूर्ण करुन दाखवतो, असं थेट आव्हान केजरीवाल यांनी स्वीकारलं आहे. (Corona Cases In Delhi Cm Arvind Kejriwal Demand 60 Lakh Anti Covid-19 Vaccine Dose For Vaccination Within Three Months To All)

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकला केंद्र सरकारनं दिल्लीसाठी मे ते जुलै या महिन्यांमध्ये दरमहिना ६० लाख लसींचा पुरवठा करावा असे आदेश द्यावेत. तीन महिन्यांत आमच्या मागणीनुसार पुरवठा केला गेला तर जुलैच्या अखेरपर्यंत दिल्लीतील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असेल, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दिल्लीत १८ ते ४५ वयोगटातील ९३ लाख लोक आहेत. या वयोगटातील नागरिकांनाचा विचार केला गेल्यास दर महिन्याला ८३ लाख लसींची आवश्यकता असल्याचंही केजरीवालांनी सांगितलं. 

दिवसाला १ लाख लोकांचं लसीकरणदिल्ली सरकारकडून दिवसाला १ लाख लोकांचं लसीकरण केलं जात असल्याची माहिती केजरीवालांनी यावेळी दिली. लवकरच दिवसाला ३ लाख लोकांचं लसीकरण करण्याचा उद्देश आणि तयारी दिल्ली सरकारनं केली आहे. त्यामुळे आम्हाला दर महिन्याला ९० लाख कोरोना लसींची गरज भासेल. याशिवाय कोरोना लसींची किंमत समान हवी मग ती केंद्र सरकारनं खरेदी केलेली असो किंवा मग राज्य सरकारनं. लसीच्या किमतीत फरक केला जाऊ नये, अशीही मागणी केजरीवालांना केली आहे. 

खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसींच्या किमती जास्त असल्यानं फायद्यानुसार सरकारऐवजी खासगी रुग्णालयांनाच कंपन्यांकडून लस पुरवली जाऊ शकते. त्यामुळे भेदभाव होऊ न देता लसीच्या किमती समान असायला हव्यात, असं केजरीवाल म्हणाले.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या