Farmer Protest: ज्यांचा हेतूच स्वच्छ नाही...; शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Published: January 8, 2021 10:36 PM2021-01-08T22:36:32+5:302021-01-08T22:37:08+5:30

Farmer Protest: शेतकरी नेते आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांमधील आठवी बैठक निष्फळ

congress leader Rahul Gandhi Attacks Modi Government over farmers protest | Farmer Protest: ज्यांचा हेतूच स्वच्छ नाही...; शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

Farmer Protest: ज्यांचा हेतूच स्वच्छ नाही...; शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

Next

नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. जवळपास दीड महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आज आंदोलक शेतकऱ्यांचे नेते आणि केंद्र सरकारमधील मंत्र्यांची बैठक कोणत्याही तोडग्याविना संपली. त्यामुळे आता १५ जानेवारीला शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये नवव्यांदा बैठक होईल. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस अध्यक्ष यांनी एका ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारच्या हेतूंवरच शंका उपस्थित केली आहे. आज शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये आठव्यांदा बैठक झाली. मात्र ती निष्फळ ठरली. यानंतर राहुल यांनी एक ट्विट केलं. 'ज्यांचा हेतू स्वच्छ नाही, त्यांची रणनीती पुढच्या तारखा देणे आहे,' असा टोला राहुल यांनी लगावला.



तिन्ही कृषी कायदे रद्द करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी नेते पहिल्या बैठकीपासून त्यांच्या या मुख्य मागणीवर ठाम आहेत. तर कायदे मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर सरकार ठाम नाही. त्यामुळेच आतापर्यंतच्या आठ बैठकांमधून तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत सरकार कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत घरी परतणार नाही, असं शेतकरी नेत्यांनी आजच्या बैठकीनंतर सांगितलं. तर कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत. सरकारनं केलेले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. यामुळे अडत्यांची भूमिका संपेल आणि शेतकरी त्यांचा शेतमाल कुठेही विकू शकतील, असं सरकारचं म्हणणं आहे.

Web Title: congress leader Rahul Gandhi Attacks Modi Government over farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.