शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

बालेकिल्ला राखण्याचे सेनेसमोर आव्हान, तिरंगी लढतीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 06:35 IST

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेनेसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे़

- अभिमन्यू कांबळेशिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेनेसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे़१९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून १९७७ चा अपवाद वगळता काँग्रेसचे वर्चस्व असलेला परभणी लोकसभा मतदारसंघ १९९१ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. परभणीनेच शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून दिली. १९९१ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे अशोकराव देशमुख २०,१६१ मतांनी निवडून आले. त्यानंतर १९९८ मधील निवडणुकीचा अपवाद वगळता सातत्याने शिवसेनेचे वर्चस्व आहे. आघाडीच्या जागा वाटपात २००४ मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला; परंतु, गेल्या तीन निवडणुकांमध्ये या पक्षाला विजय मिळविता आलेला नाही. २०१४ च्या निवडणुकीत देशभर नरेंद्र मोदी यांची लाट असताना राष्ट्रवादीचे उमेदवार आ. विजय भांबळे यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना तगडी टक्कर दिली होती. यावेळेसही भांबळे यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत; परंतु, भांबळे यांची निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. त्यांना जिंतूर विधानसभेत रस आहे. राष्ट्रवादीकडून माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर, माजी खा. सुरेश जाधव यांनीही उमेदवारी मागितली आहे; परंतु, या तिन्ही उमेदवारांपेक्षा भांबळे यांचेच नाव सध्या तरी आघाडीवर आहे. उमेदवारीच्या मतऐक्याबाबत दोनवेळा मुंबईत बैठक झाली; परंतु, एकमत झाले नाही. काँग्रेसनेही या मतदारसंघात चाचपणी केली आहे; परंतु, राष्ट्रवादीकडून हा मतदारसंघ सोडवून घेऊन तयारी करायची म्हटली तर काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांना पाथरी विधानसभेची निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी अनुत्सुकता दर्शविली आहे. दुसरीकडे भाजपचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनीही निवडणुकीची तयारी चालविली आहे़ सहा महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात दोन वेळा दौरे केले. युती होण्यापूर्वी भाजपकडून बोर्डीकरांचेच नाव चर्चेत होते; आता त्या माघार घेणार की अन्य मार्ग अवलंबितात, याची उत्सुकता आहे़ बोर्डीकर या रिंगणात कायम राहिल्या तर तिरंगी लढत होईल आणि त्याचा परिणाम शिवसेनेचे उमेदवार खा़ जाधव यांच्या मतपेटीवर होवू शकतो़ विद्यमान खासदार जाधव हे पुन्हा शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांनी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जोरदार तयारी चालविली आहे; परंतु, सेनेतील अंतर्गत मतभेदही जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा विषय झाला आहे. सेनेचे परभणीचे आ.राहुल पाटील आणि खा.जाधव यांच्यातील वाद मातोश्रीवर पोहोचला, तरीही मिटलेला नाही. शिवाय परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि खा. जाधव यांचेही मतभेद मिटलेले नाहीत, हीदेखील शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे. रावते यांना मानणारा परभणीत मतदार आहे. त्यामुळे या वादावर पुन्हा एकदा मातोश्रीवरून तोडगा निघाला तरच जाधव यांना सेनेचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्याचा मार्ग सुकर होईल़>सध्याची परिस्थिती२०१४ च्या निवडणुकीत खा.संजय ऊर्फ बंडू जाधव यांना पक्षा व्यतिरिक्त आ.विजय भांबळे यांच्या विरोधातील कॉंग्रेस- राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांनीही मदत केली होती. यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. खा. जाधव यांना मदत करणारे तत्कालीन सहकारी आता त्यांच्यापासून दूर गेले आहेत. शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सलोख्याचे संबंध नाहीत. त्यामुळे एकमेकांना मदतीची भावना हे मित्रपक्ष कितपत बाळगतील याविषयी शंका उपस्थित होत आहे.मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरही शिवसेना- राष्ट्रवादीच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत़ परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी जिंतूर, गंगाखेड, घनसावंगी हे तीन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर पाथरी, परतूर हे दोन मतदारसंघ भाजपाकडे आहेत आणि परभणी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv Senaशिवसेना