शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
2
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
3
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
5
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
6
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
7
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
8
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
9
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
10
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
11
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
12
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
13
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
14
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
15
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
16
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
17
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
18
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
19
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
20
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
Daily Top 2Weekly Top 5

'जवानांच्या शौर्यावर संशय घेणाऱ्या वाचाळवीराला आता घरी बसवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 05:52 IST

जनतेने आपला रोष त्याला मतदानातून दाखवून द्यावा आणि त्याला घरी बसवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई : देशातील जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले, ते सर्व जगाने पाहिले. मात्र, काँग्रेसच्या एका वाचाळवीराने जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. तो वाचाळवीर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय. जनतेने आपला रोष त्याला मतदानातून दाखवून द्यावा आणि त्याला घरी बसवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी अंधेरी (पूर्व) सुभाषनगर येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. युती सरकारने गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईचा गतिमान विकास होतो आहे. मुंबईत एक लाख कोटी रुपये खर्च करून २०० किमीचे मेट्रोचे जाळे उभे राहात आहे. रेल्वेच्या विकासासाठी केंद्र सरकारने साठ हजार कोटी निधी दिला आहे. ५०० फूट घरांना मालमत्ता करात सूट, २०११ पर्यंतच्या पात्र झोपड्यांना ३०० फुटांचे मोफत घर, कोस्टल रोडची निर्मिती याचा मोठा फायदा मुंबईतील नागरिकांना होणार आहे.काँग्रेसचा अर्धा वेळ मोदींवर टीका करण्यातनिवडणुका जवळ आल्या की, काँग्रेस ‘गरिबी हटाव’चा नारा देते, पण सामान्य माणसांची गरिबी त्यांनी हटविली नाही. राहुल गांधी म्हणतात, ७२ हजार रुपये देणार. त्यांना विचारले कसे देणार? तर त्यांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. काँग्रेसची भाषणे आणि आश्वासने पोकळ आहेत. त्यांचा अर्धा वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात जातो, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारार्थ दहिसरमधील अशोकवन येथे मुख्यमंत्री बोलत होते.‘आमच्या काळात मुंबईकर सुरक्षित’२००८ साली आघाडी सरकारच्या काळात मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली होती. मात्र, आमच्या गेल्या साडेचार वर्षांच्या काळात मुंबईकर सुरक्षित राहून मुंबईत एकही बॉम्बस्फोट झाला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmumbai-north-west-pcमुंबई उत्तर पश्चिम