शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भुषवणाऱ्यांचा थोडक्यात आढावा.

By admin | Updated: November 20, 2015 00:00 IST

ज्योती बसू भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे.तरुण गोगोई हे आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मे २००१ पासून तीन वेळा आसामचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. ते भारतीय राष्ट्रीय ...

ज्योती बसू भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे.

तरुण गोगोई हे आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मे २००१ पासून तीन वेळा आसामचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.

शीला दीक्षित १९९८ सालापासून तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण १५ वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. परंतु २०१३ दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी दीक्षित ह्यांचा दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव केला.

पवनकुमार चामलिंग हे सिक्किम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असलेले चामलिंग मुख्यमंत्रीपदावर १९९४ सालापासून आहेत.

ओक्राम इबोबी सिंग हे मणिपूर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २००२ सालापासून ते सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपदावर निवडून आले आहेत.

नवीन पटनायक हे ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व माजी केंद्रीय खाणमंत्री आहेत. बिजु जनता दल पक्षाचे संस्थापक असलेले पटनायक एक लेखक देखील आहेत. २००० पासून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

माणिक सरकार हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजकारणी आहेत. १९९८ सालापासुन त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट बूरो सदस्य ही आहेत. २०१३ झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीनंतर ते सहाव्यांदा आमदार व चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.

नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे २६ इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७ २००१ पासून मे २२ २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते

भाजपाचा दणदणीत पराभव करून बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या महागठबंधनचे प्रमुख नेते नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली आहे.