शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'त्या' भाजप खासदारानं २४ तासांत राजीनामा मागे घेतला; दिलं 'चकटफू' कारण

By कुणाल गवाणकर | Updated: December 30, 2020 16:32 IST

मनसुख वसावा यांनी कालच दिला होता राजीनामा

गांधीनगर: भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनसुख वसावा यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. वसावा यांनी कालच खासदारकी सोडत असल्याचं म्हणत राजीनामा दिला होता. मात्र आज त्यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची बैठक घेतल्यानंतर वसावा यांनी गांधीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. 'मी खासदार राहिलो तरच माझ्या पाठीवर आणि मानेवर मोफत उपचार होतील. मी खासदारकीचा राजीनामा दिल्यास मोफत उपचार शक्य नाहीत, असं मला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं. त्यांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला. माझ्या वतीनं स्थानिक कार्यकर्ते आणि पक्षाची यंत्रणा काम करेल, असंदेखील मला वरिष्ठांनी सांगितलं,' अशी माहिती वसावा यांनी दिली. 'माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी राजीनामा दिला होता. माझ्या राजीनाम्यामागचं ते एकमेव कारण होतं. त्याचबद्दल मी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आता वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधल्यानंतर मी माझा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी खासदार म्हणून माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करत राहीन', असं वसावा यांनी म्हटल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.नर्मदा जिल्ह्यातल्या आदिवासी भागातील १२१ गावांचा समावेश इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये झाल्यानं मी नाराज असल्याची चर्चा होती. पण त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं वसावा यांनी स्पष्ट केलं. 'इको सेन्सेटिव्ह झोनबद्दलचे वाद सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यामुळे पक्ष किंवा सरकारबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. आदिवासींसाठी सर्वाधिक काम भाजप सरकार करत आहे. याआधीच्या कोणत्याही सरकारनं इतकं काम आदिवासींसाठी केलेलं नाही,' असंही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपा