शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

धुळ्यात भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 5:04 AM

मत विभाजनामुळे चुरस; आ. गोटे आणि वंचित बहुजन आघाडीमुळे रंगत

- राजेंद्र शर्माधुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्यात होणाऱ्या चुरशीच्या सरळ लढतीला आता भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारीमुळे रंगत आली आहे.भाजपतर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तर काँग्रेसतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात प्रचाराची सुरुवातच धुळे येथून केली. दोघांच्या प्रचारसभा या आचारसंहिता जाहीर होण्याआधीच झाल्या. या प्रचारसभांमुळे आता धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात आहे, पण खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये होत आहे. त्यात भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगावचे राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक नबी अहमद यांच्या उमेदवारीमुळे अधिक चुरस निर्माण झाली आहे. कारण आमदार गोटे यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या मतांचे विभाजन होणार आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगावचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नबी अहमद यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसला मिळणाºया मुस्लीम मतांची विभागणी होणार आहे. बसपातर्फे नंदुरबारचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय अपरांती हे उमेदवार आहेत. यांच्यामुळे दलित व अल्पसंख्याक समाजाच्या मतांची विभागणी होणार आहे. याशिवाय भाजप आणि काँग्रेसने मराठा उमेदवार दिल्याने मतदारसंघातील मराठा मतांचेही विभाजन निश्चितच होणार आहे. या सर्व कारणामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. शेवटच्या क्षणी कोण बाजी मारेल, हे आजच सांगणे कठीण आहे, परंतु निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे, हे मात्र निश्चित.२०१४ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने खासदार झालो. संरक्षण सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. पाच वर्षांत २५ हजार कोटींचा निधी आणला. सुलवाडे-जामफळ, कनोली उपसा योजनांकरिता अडीच हजार कोटींचा निधी आणला. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग मार्गी लावला. कॉँग्रेस आघाडीने काहीच काम केले नाही.- डॉ. सुभाष भामरे, भाजपशेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य मतदार हे गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत. या मतदारसंघातील खासदार प्रचंड अकार्यक्षम असल्याने लोकांची निराशा झाली आहे. त्यामुळे सर्व जनता माझ्या सोबत खंबीरपणे उभी आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने मला विजयाबद्दल विश्वास आहे.- कुणाल पाटील, काँग्रेसकळीचे मुद्देदिल्ली - मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर (डीएमआयसी) या प्रकल्पाचे काम रखडल्याने मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाचा प्रश्न ऐरणीवर जामफळ - कनोली आणि तापी - प्रकाशा - बुराई या दोन प्रकल्पांसह अन्य रेंगाळलेल्या सिंचन प्रकल्पांचा प्रश्न, बेरोजगारी हे मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019dhule-pcधुळे