शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Bihar Election Result Live: बिहार निवडणुकीत शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही; सर्व २२ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान

By प्रविण मरगळे | Updated: November 10, 2020 15:30 IST

Bihar Election Result Live, Shiv Sena News: या निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत २२ जागांवर उमेदवार उभे केले होते

ठळक मुद्देशिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला जेडीयूने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने चिन्ह बदललं होतं.बिहारी जनतेने शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान केले, अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्तीची शक्यता शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना पराभव सहन करावा लागणार

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहेत, या एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला ७३ जागांची आघाडी आहे तर जेडीयूला ४९ जागांची आघाडी आहे तर राजद सध्या ६८ जागांवर आघाडी आणि काँग्रेसला अवघ्या २० जागांवर आघाडी मिळाल्याचं निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांवरून दिसत आहे. संपूर्ण मतमोजणीचा निकाल रात्री उशीरापर्यंत येईल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस-राजद आघाडीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळत असल्याचं दिसून आलं. परंतु हळूहळू एनडीएनेही मुसंडी मारली. सध्या एनडीए १३० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत उमेदवार उभे केले होते, पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना ५० जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने २२ जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व २२ जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला जेडीयूने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणुका लढवता येणार नाही असा आदेश दिला, त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किट चिन्ह दिले, पण नापसंत पडल्याने शिवसेनेने दुसरं चिन्ह देण्याची मागणी केली, शिवसेनेची विनंती मान्य करत निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारं चिन्ह शिवसेनेला दिलं होतं. दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मतदान झाल्याचं दिसून आलं.

शिवसेनेच्या उमेदवारांना झालेलं मतदान

पहिला टप्पा

मनीष कुमार – पालीगंज – १०७ मते

ब्युटी सिन्हा – गया शहर – १४५ मते

मृत्युंजय कुमार – वजीरगंज  - ६८ मते

दुसरा टप्पा

संजय कुमार – चिरैय्या  - मते ३०५

संजय कुमार झा – बेनीपूर – मते ७५४

रंजय कुमार सिंह – तरैय्या – मते ३७८

विनिता कुमारी – अस्थवां – १८० मते

रवींद्र कुमार – मनेर – १४१ मते

जयमाला देवी – राघोपुर – मते १२२

विनोद बैठा – भोरे – मते ६९६

शंकर महसेठ – मधुबनी – मते ३२२

तिसरा टप्पा

प्रदीप कुमार सिंह – औराई  - मते ३३१

शत्रूघन पासवान – कल्याणपुर  - मते १०३२

सुभाषचंद्र पासवान – बनमंखी – मते १३१

नवीन कुमार मल्लीक – ठाकूरगंज – मते ७०७

कुंदन कुमार – समस्तीपुर – मते ४६

पुष्पांकुमारी – सराय रंजन – मते २६९

मनीष कुमार – मोरवा – मते २१०

शिवनाथ मल्लीक – किशनगंज – मते २०१

चंदन कु. यादव – बहादुरगंज – मते ११६६

गुंजा देवी – नरपरगंज – मते १२५

नागेंद्र चंद्र मंडल – मनिहारी  - मते ४९६

२०१५ मध्ये लढवल्या ८० जागा

सन २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने २४३ जागांपैकी ८० जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडणूक आला नाही. मात्र, शिवसेनेला एकूण 2 लाख 11 हजार 131 मते मिळाली होती. त्यात हयाघाट, बोचहा, दिनारा जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब आणि मोरवा या सात विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. विशेष म्हणजे एकूण ३५ जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही अधिक मते मिळाली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेलाही ‘नोटा’पेक्षाही अधिक मतदान झालं नाही.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल