पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करूनही महाआघाडीला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे महाआघाडीमधील घटक पक्षांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहेत. त्यातच आता बिहारमधील निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसवर आरजेडीने जोरदार टीका केली आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ही महाआघा़डीसाठी पायातील बेडी बनली अशी टीका आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी केली आहे.शिवानंद तिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, महाआघाडीसाठी काँग्रेस ही बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती.
बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडीसाठी बेडी ठरली, आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याने केला आरोप
By बाळकृष्ण परब | Updated: November 15, 2020 23:29 IST
Bihar Assembly Election 2020 News : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे महाआघाडीमधील घटक पक्षांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहेत. त्यातच आता बिहारमधील निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसवर आरजेडीने जोरदार टीका केली आहे.
बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडीसाठी बेडी ठरली, आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याने केला आरोप
ठळक मुद्देबिहारमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ही महाआघा़डीसाठी बेडी बनली अशी टीका आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी केली काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीतराहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती