शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

Bihar Assembly Election Results: कुणामुळे जिंकलं बिहार?; पंतप्रधान मोदींनी मानले 'सायलेंट व्होटर्स'चे खास आभार

By कुणाल गवाणकर | Updated: November 11, 2020 20:43 IST

Bihar Assembly Election Results: मोदींनी सांगितलं निवडणूक विजयामागचं रहस्य; 'सायलेंट व्होटर्स'चा विशेष उल्लेख

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. बिहारच्या जनतेनं जंगलराजला नाकारून विकासाला, सुशासनाच्या बाजूनं कौल दिल्याचं मोदी म्हणाले. कोरोना संकट काळातही मतदार बाहेर पडून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचं मोदींनी म्हटलं.निवडणुकीसाठी मतदान पार पडलं की पूर्वी हिंसाचाराच्या, मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याच्या, मतपेट्या पळवून नेल्याच्या बातम्या यायच्या. मात्र आता शांततेत मतदान झाल्याच्या, मतदान वाढल्याच्या बातम्या येतात. ही बाब अतिशय सकारात्मक असल्याचं मोदी म्हणाले. याबद्दल त्यांनी देशवासीयांचे आभार मानले. बिहारच्या जनतेनं विकासाला प्राधान्य देत एनडीएच्या बाजूनं अतिशय स्पष्ट कौल दिल्याचं ते पुढे म्हणाले. बिहार निवडणुकीत महागठबंधन बाजी मारेल, असे अंदाज जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आले होते. मात्र सर्व अंदाज चुकवत बिहारमध्ये एनडीएनं बाजी मारली. त्यातही भाजपनं जोरदार मुसंडी मारली. त्यामागचं रहस्यदेखील मोदींनी सांगितलं. 'बिहारच्या निवडणुकीनंतर सायलेंट व्होटरची चर्चा सुरू आहे. भाजपकडे एक मोठा वर्ग आहे. हा वर्ग सायलेंट व्होटर आहे. तो वर्ग भाजपला हक्कानं मतदान करतो,' असं मोदी म्हणाले.महिला मतदार भाजपच्या सायलेंट व्होटर असल्याचं मोदींनी सांगितलं. 'भाजप सरकारमध्ये महिलांना सन्मान मिळाला, सुरक्षा मिळाली. जनधनच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात थेट रोख रक्कम गेली. उज्ज्वला योजनेतून मिळणाऱ्या सिलेंडरमुळे त्याच्या स्वयंपाकघरातला धूर दूर झाला. शौचालयांची बांधणी, वीज पुरवठा, १ रुपयात सॅनिटरी पॅड यामुळे महिलांना मोठा फायदा झाला. याच महिला मतदार भाजपच्या सायलेंट व्होटर आहेत. महिलांचा आशीर्वाद कायम भाजपला मिळतो. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असं मोदी म्हणाले.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा