शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

'...तर उद्या तुमच्या मुलांना पळून जाण्यास भाग पाडेल', चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर निशाणा

By ravalnath.patil | Updated: October 6, 2020 10:08 IST

Bihar Assembly Election 2020 : लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) प्रमुख चिराग पासवान यांनी बिहारमध्ये १४३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

पाटना : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीसाठी भाजपा आणि जनता दल यूनायटेड (जदयू) यांची युती निश्चित झाली आहे. तर रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) प्रमुख चिराग पासवान यांनी बिहारमध्ये १४३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

चिराग पासवान यांनी सोमवारी बिहारच्या मतदारांना खुले पत्र लिहून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधाला असून जनता दलाला मते न देण्याचे आवाहन केले आहे. "बिहार राज्याच्या इतिहासातील मोठा निर्णायक क्षण आहे. करोडो बिहारींच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. कारण, आता आपल्याजवळ गमवण्यासाठी आणखी वेळ नाही आहे. जदयूच्या उमेदवारास दिलेले एक मत सुद्धा उद्या तुमच्या मुलांना पळून जाण्यास भाग पाडेल," असे चिराग पासवान यांनी ट्विट केले आहे. या ट्विट सोबत त्यांनी बिहारमधील जनेतला उद्देशून एक भावनिक पत्र देखील जोडले आहे. यामध्ये नितीशकुमार यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र त्या पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, असे चिराग पावसान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोजपने २४३ जागांपैकी फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. मतांची टक्केवारी होती ४.८३ टक्के. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोजपने लढवलेल्या सहाही जागा जिंकल्या होत्या. त्यात मोदी फॅक्टर कामाला आला होता. विधानसभा निवडणुकीत लोजप १४३ जागा लढवणार आहे.

तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार