शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये NDA २२० जागा जिंकणार, भाजपाच्या मोठ्या नेत्याचे भाकित

By बाळकृष्ण परब | Updated: September 29, 2020 18:01 IST

पाटणा - एकीकडे कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि ...

ठळक मुद्दे बिहारच्या जनतेचा नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास आम्ही गेल्या १५ वर्षांत जे काम केले आहे. त्या आधारावर मत मागत आहोतएनडीएमध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाही. बीजेपी, जेडीयू , एलजेपी आणि मांझी यांचा पक्ष एकत्र आहेत

पाटणा - एकीकडे कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि देशातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सभा, प्रचार यावर अनेक निर्बंध घातले असले तरी सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चेबांधणी आणि दावे-प्रतिदावे जोरात सुरू आहेत. दरम्यान, बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए २२० जागा जिंकून दणदणीत विजय मिळवेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी केला आहे. एनडीए बिहारमधील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे आणि या निवडणुकीत एनडीएला २२० जागा मिळतील, असे शाहनवाझ हुसेन यांनी म्हटले आहे.शाहनवाझ हुसेन म्हणाले की, बिहार विधानसभेसाठी आता निवडणुकीची घोषणा झालेली आहे. बिहारच्या जनतेचा नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास आहे. कोरोनाकाळात राज्य आणि केंद्र सरकारने जे काम केले आहे ते लोकांना दिसत आहे. यावेळी हुसेन यांनी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलावरही जोरदार टीका केली. जे लोक रजिस्ट्रीशिवाय तिकीट देत नव्हते ते आज दहा लाख रोजगार देण्याच्या बाता मारत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले की आम्ही गेल्या १५ वर्षांत जे काम केले आहे. त्या आधारावर मत मागत आहोत. आम्ही पटणामध्ये एम्स बांधले. चार लाख शिक्षकांची नियुक्ती केली. नर्सिंग कॉलेज सुरू केले. आम्ही वाकासाच्या मुद्द्यावरूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमची आघाडी चांगली आहे. एनडीएमध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाही. बीजेपी, जेडीयू , एलजेपी आणि मांझी यांचा पक्ष एकत्र आहेत. आमच्यात लवकरच जागावाटप होणार आहे.मात्र एकीकडे शाहनवाझ हुसेन हे एनडीएमध्ये सारे काही आलबेल असल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे एलजेपीचे राष्ट्रीय सरचिटणीस शाहनवाझ अहमद यांनी काही वेळापूर्वीच पक्षाकडून चिराग पासवास हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील असा दावा केला आहे. तसेच एलजेपीने एनडीएसमोर ४२ जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र भाजपा-जेडीयूने त्यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020BJPभाजपाBiharबिहारPoliticsराजकारण