शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ की पुन्हा अनिलरावच?, लोकसभा उमेदवारी भाजपात संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 01:02 IST

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतही लोकसभेच्या पुणे मतदारसंघात उमेदवार कोण, याविषयी अजूनही संभ्रमच आहे.

पुणे : सत्ताधारी भारतीय जनता पार्टीतही लोकसभेच्या पुणे मतदारसंघात उमेदवार कोण, याविषयी अजूनही संभ्रमच आहे. पालकमंत्री गिरीश बापट ऊर्फ भाऊ बाजी मारणार की पक्ष म्हणून अनिलराव ऊर्फ अनिल शिरोळे यांनाच उमेदवारी देणार याची चर्चा आता पक्षसंघटनेतही सुरू झाली आहे. बापट यांनी उमेदवारी मागितल्यामुळे यात रंगत आली आहे.मागच्या वेळीच बापट यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती, मात्र ती माळ शिरोळे यांच्या गळ्यात पडली. ते तब्बल सव्वातीन लाख मतांच्या फरकाने ते निवडून आले व लोकसभेच्या या मतदारसंघात प्रथमच भाजपाचा झेंडा फडकला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बापट यांनी आपला कसबा मतदारसंघ कायम राखला व सत्ता आल्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थानही मिळवले. आता बापट पुन्हा लोकसभेची उमेदवारी मागत असल्याची चर्चा आहे. स्वत: बापट यांनी याबाबत काहीही जाहीर वक्तव्य केले नसले तरी त्यांच्या समर्थकांकडून मात्र भाऊंना आता लोकसभेचे वेध लागले असल्याचे बोलले जात असते.दुसरीकडे विद्यमान खासदार शिरोळे यांनीही उमेदवारीसाठी आपली ताकद पणाला लावली आहे. गेल्या साडेचार वर्षातील कामाचा ताळेबंद ते वारंवार मांडत आहेत. जाहीर स्नेहमिलन मेळावा घेऊनच त्यांनी आपल्या उमेदवारीचे बिगुल वाजवले आहे. तसेच पुण्याचे पाणी व अन्य काही विषयांवर आक्रमक भूमिका घेऊन आपली प्रतिमा मतदारांसमोर कायम राहील याचीही काळजी घेतली आहे. अनिलरावांना (जवळच्या कार्यकर्त्यांमधील नाव) उमेदवारीची काहीच अडचण नाही असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी मात्र उमेदवारीबाबत अजून हाताची घडी तोंडावर बोट अशीचभूमिका ठेवल्यामुळे संभ्रम वाढत चालला आहे.योगेश गोगावले यांच्या भुमिकेकडे लक्षपक्षाच्या शहर शाखेत या दोन्ही नावांची दबक्या आवाजात चर्चा सुरू असते. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी निकटच्या काही कार्यकर्त्यांबरोबर खासगीत बोलताना आपणही लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सूतोवाच केले होते, मात्र त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद हवी असेल असे कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे सध्या भाऊ की अनिलराव, अशा दोन नावांभोवतीच सर्व चर्चा घोटाळते आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९girish bapatगिरीष बापट