शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मावळमधील पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे बारामतीकरांनी केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 02:31 IST

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभा उमेदवारी जाहीर झाली आहे.

बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभा उमेदवारी जाहीर झाली आहे. या उमेदवारीचे बहुतांश बारामती करांनी जोरदार स्वागत केले आहे. बारामती पॅटर्न राज्यात नावाजलेला आहे. त्यामुळे मावळची बारामती होईल, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. तर काहींनी ही उमेदवारी म्हणजे घराणेशाही लादल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.‘लोकमत’ने याबाबत बारामतीकरांशी संवाद साधला. यावेळी अनिता खरात म्हणाल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली निवड चांगलीच आहे. बारामतीच्या यशानंतर बारामतीच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी थेट नेतृत्व केल्यास परिसराला फायदाच होईल. त्या ठिकाणी बारामती पॅटर्न राबविल्यानंतर मावळचा चेहरामोहरा बदलेल.प्रा. अजय दरेकर म्हणाले, तरुण नेतृत्वाला संधी मिळणे देशाच्या परिसरासाठी पोषक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले हे नेतृत्व मावळला प्रगतीच्या दिशेने नेईल. त्यामुळे या उमेदवारीचे स्वागतच आहे. अमोल दोशी म्हणाले, घराणेशाही लादायला नको होती. त्याऐवजी स्थानिक उमेदवारी देणे अपेक्षित होते.अमित परदेशी म्हणाले, पार्थ पवार नवखे असले तरी त्यांना घरातुनच राजकारणाचे बाळकडू आहे. अजित पवार यांना मतदारसंघाची चांगली जाण आहे. त्यामुळे पार्थ यांची उमेदवारी योग्यच आहे. राहुल जाधव म्हणाले, अजित पवार यांच्याच माध्यमातून पिंपरी चिंचवडचा कायापालट झाला आहे. त्यावरुनच पवार कुटुंबातील नेतृत्व विकासाचा वारसा पुढे नेण्याची क्षमता आहे.रोहिदास बिनवडे म्हणाले, पार्थ पवार युवक नेतृत्व आहे. पवार कुटुंबातील असल्याने त्यांना चांगला जनाधार आहे. प्रश्न सोडविण्याची त्यांची चांगली क्षमता आहे. डॉ. लक्ष्मण पोंदकुले म्हणाले, चांगलाच निर्णय आहे. नवीन पिढीच्या हातात कारभार देण्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा निर्णय महत्त्वाचा आहे. पवारांचा वारसा चांगला चालविला जाईल.भारत कुंभार म्हणाले, तरुण पिढीला संधी देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. कारभार पेलण्याची ताकत असलेले नेतृत्व आहे. सी. डी. तावरे म्हणाले, मावळमधून योग्य निवड झाली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, याची खात्री आहे. जाकीर सय्यद म्हणाले, नवीन विचार, नवीन जोश असेल तर काही अशक्य नाही. त्यातच पार्थ यांना पवार कुटुंबाचे पाठबळ असल्याने त्याचा मावळला फायदाच होईल.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBaramatiबारामती