शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

ए. राजा यांच्या प्रचारावर बंदी घाला, अण्णा द्रमुकची निवडणूक आयोगाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 04:58 IST

Tamil Nadu Assembly Elections 2021 : द्रमुक पक्षाचे नेते, खासदार ए. राजा यांना मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांच्याविरोधात केलेली खालच्या पातळीची टीका महागात पडण्याची चिन्हे आहेत.

चेन्नई : द्रमुक पक्षाचे नेते, खासदार ए. राजा यांना मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांच्याविरोधात केलेली खालच्या पातळीची टीका महागात पडण्याची चिन्हे आहेत. ए. राजा यांना विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यावर बंदी घालावी अशी मागणी अण्णा द्रमुक पक्षाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे.तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शुक्रवारी एका मतदारसंघात प्रचार करताना खासदार ए. राजा यांनी मुख्यमंत्री पलानीसामी यांच्यावर आक्षेपार्ह व खालच्या पातळीची टीका केल्याचा आरोप अण्णा द्रमुक पक्षाच्या कायदा विभागाच्या सहसचिवांनी लावला आहे. राजा यांना प्रचार करण्यावर बंदी घालावी. त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार द्यावी. तसेच त्यांचा खासदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी अण्णा द्रमुकने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडिओ आणि स्थानिक माध्यमात प्रसारित झालेल्या बातम्यांची कात्रणे अण्णा द्रमुक नेत्यांनी आपल्या तक्रारीसोबत जोडली आहेत. दरम्यान द्रमुकप्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी दिलेल्या निवेदनात प्रचार दरम्यान विरोधी नेत्यांचा आदर सन्मान ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पण त्यांनी निवेदनात कोणाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.ए. राजा यांनी मागितली मुख्यमंत्र्यांची माफीचेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंंत्री ई. पलानीसामी यांच्या दिवंगत आईविषयी केलेल्या आक्षेपार्ह टीकेबद्दल द्रमुकचे नेते, खासदार ए. राजा यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची माफी मागितली. आपल्या वक्तव्याचा विपर्यहास करण्यात आल्याचा दावा ए. राजा यांनी केला.  रविवारी एका सभेदरम्यान मुख्यमंत्री पलानीसामी हे टीकेवरून भावूक झाले होते. हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता असल्याने राजा यांनी माफी मागत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.गुडलूर येथील जनसभेत राजा यांनी स्पष्ट केले की,  मुख्यमंत्री पलानीसामी यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचा आपला कोणताही विचार नव्हता. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान करण्याचा उद्देश देखील नव्हता. आपण  एका मुलाचे उदाहरण देत  पलानीसामी आणि एम. के स्टॅलिन यांच्यामध्ये तुलना करण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. पलानीसामी हे त्यामुळे व्यथित झाल्याचे ऐकून मला दुख झाले. मी त्याबद्दल माफी मागतो असे ए. राजा यांनी सांगितले. शुक्रवारी एका सभेदरम्यान ए. राजा यांनी मुख्यमंत्री पलानीसामी यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावरून तमिळनाडूच्या राजकारण वाद पेटला होता. द्रमूक नेते एम. के स्टॅलिन यांनी याची दखल घेत नेत्यांनी टीका करताना विरोधी पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवावा, असा कोणाचेही नाव न घेता सल्ला दिला होता.  तमिळनाडूतील इतर पक्ष, नेत्यांनी सुद्धा राजा यांच्या टीकेचा निषेध केला होता. 

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Dravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम