शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उत्तर प्रदेशातून प्रचंड शस्त्रसाठा हस्तगत, साडेतीन कोटींची दारू व रोख रक्कमही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:51 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी बुलंदशहरमधून प्रचंड दारूसह, बेहिशेबी रोकड आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

बुलंदशहर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी बुलंदशहरमधून प्रचंड दारूसह, बेहिशेबी रोकड आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. बुलंदशहर पोलिसांना नियमित तपासणीच्या वेळी तो सापडला.यात दोन कोटी रुपये किमतीची दारू व दीड कोटी रुपयांची रोकड आहे. याखेरीज ४०५ अवैध शस्त्रे, ७३९ काडतुसेही पोलिसांनी ताब्यात घेतली. निवडणुकीच्या काळात हिंसाचार घडविण्यासाठी आणि मतदारांना आमिष दाखविण्यासाठी, तसेच प्रसंगी धमकावण्यासाठी या साऱ्यांचा वापर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात एवढी बेकायदा शस्त्रे प्रथमच सापडली आहेत.या आधी पोलिसांनी व प्राप्तिकर विभागाने निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ, सोने, चांदी, दागिने, भेटवस्तू असा २,५0४ कोटी रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. त्यातील सर्वाधिक ऐवज गुजरातमधून जप्त करण्यात आला होता. मात्र, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांतूनही रोख रक्कम, दारू जप्त करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा