शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२३ गावांचा निर्णय राजकीय हेतूनेच - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 22:13 IST

Pune News: न्यायालयाच्या आदेशानुसारच सदरची २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट होत आहेत. सन २०१४ मध्येच पुणे महापालिका हद्दीत ३४ गावे समाविष्ट करण्याबाबत अधिसूचना यापूर्वी निघाली आहे.

  लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य सरकारने २३ गावांचा पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा घेतलेला निर्णय हा घिसाडघाईने आणि राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेउन घेतला आहे़ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

    या गावांचा समावेश हा टप्प्याटप्प्याने करावा व तेथील नागरिकांची आणि प्रशासनाने केलेली मागणी लक्षात घेऊन, गावांच्या विकासासाठी पुरेशा निधीची व्यवस्था करुनच गावांच्या समावेशाचा निर्णय घ्यावा ही आमची भूमिका होती. मात्र गोंधळलेल्या राज्य सरकारने आज  घाईगडबडीत ही अधिसू्चना काढून या गावातील नागरिकांच्या अपेक्षा धुडकावून लावल्या आहेत.     सरकारने या गावांच्या विकासासाठी किती निधी देणार आणि प्रशासनाच्या मागणीनुसार ९ हजार कोटीची तरतूद करुन ती या गावातील विकासकामांसाठी पुणे मनपास देणार का याचाही खुलासा करावा, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.

    कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असून, मनपा हद्दीत या गावांची भर पडल्याने विकासकामांसाठी खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासनाची तारांबळ होणार आहे. या सर्वामध्ये मात्र या गावातील नागरिकांची फरफट होणार आहे हे सरकारने लक्षात घेतले नसल्याचे ते म्हणाले.

पुणे महापालिका हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना जाहीर 

न्यायालयाच्या आदेशानुसारच सदरची २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट होत आहेत. सन २०१४ मध्येच पुणे महापालिका हद्दीत ३४ गावे समाविष्ट करण्याबाबत अधिसूचना यापूर्वी निघाली आहे. त्यामुळे आता पुन्हा अधिसूचना काढायची काही गरज नव्हती. परंतु, गेली तीन वर्षे रखडलेली ही प्रक्रिया सुरू झाल्याने एक समाधानाचे वातावरण या गावांमध्ये निर्माण झाले आहे.श्रीरंग चव्हाणहवेली तालुका नागरी कृती समिती.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाchandrakant patilचंद्रकांत पाटील