शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ तक्रारी, ७५ जणांना नोटिसा पाठवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:01 IST

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ तक्रारी दाखल झाल्या

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी ५६ तक्र ारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत. ७५ तक्र ारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. त्यांना नोटिसा पाठवून खुलासा मागितला आहे. सर्वाधिक तक्र ारी चिंचवडमध्ये दाखल झाल्या असून, मावळमध्ये खोट्या तक्रारी करण्याचे प्रमाण अधिक आहे.मावळ लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करणे, माघारीची प्रक्रि या पूर्ण झाली आहे. मावळच्या रिंगणात २१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत.>अ‍ॅपवर अधिक तक्र ारी : निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा व अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा नागरिकांना आॅनलाइन तक्र ारी नोंदविण्यासाठी अ‍ॅप विकसित केले आहे. त्यावर नागरिकांच्या तक्र ारी अधिक दाखल होत आहेत. मतदारसंघात आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी अ‍ॅपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो अपलोड करणे अपेक्षित आहे. तसेच आॅफलाइन तक्र ारींची सुविधाही निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.>बोगस तक्र ारींचे प्रमाण वाढलेपनवेल विधानसभा मतदारसंघात तीन तक्र ारी खऱ्या असल्याचे आढळून आले आहे, तर कर्जतमध्ये एक तक्र ार खरी असल्याचे आढळून आले आहे. उरणमध्ये पंधरापैकी सहा तक्र ारी खोट्या असल्याचे आढळून आले, तर नऊ तक्र ारींत तथ्यता आढळून आली. मावळमध्ये ३७ पैकी सर्वच तक्र ारी खोट्या असल्याचे आढळून आले. चिंचवडमध्ये ७0 पैकी आठ तक्र ारी निकाली काढण्यात आल्या आणि ६२ तक्र ारींत सत्यता आढळून आली. पिंपरीत पाचपैकी पाचही तक्र ारीत सत्यता आढळून आली नाही. ५६ तक्र ारी निकाली काढल्या आहेत, ७५ तक्र ारींमध्ये तथ्य आढळून आले असून, त्यांना निवडणूक आयोगाने नोटिसा पाठवून खुलासा मागितला आहे. राजकीय द्वेषातून तक्र ारी दाखल करण्याची आणि यंत्रणा कामाला लावण्याचेही प्रकार शहरात घडले आहेत. सर्वाधिक तक्र ारी चिंचवडमध्ये दाखल झाल्या असून मावळमध्ये दाखल झालेल्या सर्वच तक्र ारींत सत्यता नसल्याचे आढळून आले आहे. पिंपरीतीलही एकाही तक्र ारीत तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. तसेच सजग नागरिकांनी अ‍ॅपद्वारे तक्र ारी देण्यावर भर दिल्याचे माहितीत आढळून आले आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019