शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

प्राणीसंग्रहालय कार भाराचा खेळखंडोबा

By admin | Updated: March 20, 2017 04:25 IST

महापालिकेच्या वतीने संभाजीनगर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय उभारले आहे. या प्राणी संग्रहालयाच्या

पिंपरी : महापालिकेच्या वतीने संभाजीनगर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय उभारले आहे. या प्राणी संग्रहालयाच्या कारभाराचा गेल्या काही वर्षांपासून खेळखंडोबा सुरू आहे. कधी मृत सापांचा खच पडलेला आढळून येतो.कधी किंग कोब्रा गायब होतो. तर कधी उद्यानांतच पार्ट्या केल्याचा प्रकार उघडकीस येतो. आता ७ मगरी गायब झाल्याचा, ४ मगरींचा मृत्यू झाल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाचे (सेंट्रल झू अ‍ॅथोरिटी) नियम धाब्यावर बसवून तिकिटांवर प्राण्यांचे प्रदर्शन करण्याचा उद्योग महापालिकेने सुरू ठेवला आहे. महापालिकेच्या संभाजीनगर येथील प्राणी संग्रहालय आणि सर्पोद्यानात अनेक गैरप्रकाराच्या घटना घडल्या आहेत. सर्पोद्यानाचे तत्कालीन संचालक अनिल खैरे यांच्या काळात काही महिन्यांसाठी किंग कोब्रा गायब झाला होता. किंग कोब्रा गायब झाल्याचे प्रकरण दहा वर्षांपूर्वी गाजले होते. त्यानंतर बदकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण वृक्षप्राधिकरण समितीच्या सदस्यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर सर्पमित्रांनी पकडून आणलेले साप उद्यानात जमा केल्यानंतर साप ठेवलेल्या प्लॅस्टिक बरण्या तसेच बॅगा उघडण्याची तसदी उद्यानातील कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळे एकदा तब्बल ३० साप आणि त्यानंतर पुन्हा घडलेल्या घटनेत २० साप मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले होते. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सापांचा मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आली होती. सर्पमित्रांनी ज्या सापांना जीवदान दिले, त्यांची देखभाल होईल, योग्य प्रकारे संवर्धन केले जाईल, अशी अपेक्षा असलेल्या ठिकाणी उद्यानात मृत सापांचे खच पडलेले नागरिकांना पाहावयास मिळाले. सर्पमित्रांनी पकडून आणलेल्या सापांचे काय करायचे? याबद्दलचे धोरणच स्पष्ट नव्हते. ज्यावेळी साप मृत झाल्याची घटना घडली. त्या वेळी सर्पमित्रांनी जखमी अवस्थेतील साप सर्पोद्यानात आणून सोडू नयेत, अशी भूमिका सर्पोद्यानाच्या व्यवस्थापनाने घेतली. दर तीन वर्षांनी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून प्राणी संग्रहालयाच्या परवानगीचे नूतनीकरण करावे लागते. पालिकेने २०१५ मध्ये परवान्याचे नूतनीकरण केले आहे. २०१८ मध्ये पुन्हा नूतनीकरण करावे लागणार आहे. छोट्या स्वरूपातील प्राणीसंग्रहालय अशी परवानगी देण्यात आलेली आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची समिती स्थापन करून प्राणीसंग्रहालय पुनर्विकासाचा १५ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. (प्रतिनिधी)