शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही बोलत राहा, होईल टायपिंग, लिंगोसेव्ही अप्लिकेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:50 IST

संगणक अभियंता असलेल्या चिंचवडच्या चैतन्य चोरडिया या तरुणाने बोली संवाद तेवढ्याच जलदगतीने संगणकावर टाइप करणारी संगणक प्रणाली विकसित केली आहे

पिंपरी : संगणक अभियंता असलेल्या चिंचवडच्या चैतन्य चोरडिया या तरुणाने बोली संवाद तेवढ्याच जलदगतीने संगणकावर टाइप करणारी संगणक प्रणाली विकसित केली आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत संवादानुसार तोंडातून जसे शब्द बाहेर पडतील, त्याप्रमाणे संगणकाच्या स्क्रीनवर शब्द टाइप होत जाणारे हे अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त ठरणारे असून, चैतन्यने या संगणक प्रणालीसाठी (बौद्धिक संपदा कायद्यानुसार) कॉपीराईट मिळविले आहेत. हाताचा, बोटांचा उपयोग न करता संगणकाच्या की बोर्डशिवाय या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून टायपिंग करणे सहज शक्य होणार आहे.वाहतूक व्यवस्थापनावर संशोधनआयटी इंडस्ट्रीमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला. परंतु अलीकडच्या काळात आयटीतील रोजगाराची शाश्वती उरली नाही. आयटी क्षेत्रात परदेशी कंपन्यांची कामे घेतली जातात. सर्व्हिस सेक्टर असे आयटी इंडस्ट्रीचे स्वरूप आहे. येथील कंपन्या इतर देशांकडून मिळणाºया कामावर अवलंबून आहेत. नवे संशोधन होणे काळाची गरज आहे. आयटी क्षेत्रात संशोधनाचे काम झाल्यास या क्षेत्रातील रोजगार शाश्वत होऊ शकतो, हे लक्षात घेऊन संशोधनाकडे वळालो. आगामी काळात त्यावर संशोधन करण्याचा मनोदय आहे, असे चोरडिया यांनी सांगितले.लिंगोसेव्ही हा शब्द स्पॅनिश असून, त्याचा अर्थ बोली जाणकार असा आहे. शासकीय कार्यालये व खासगी संस्था आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टायपिंगचे काम चालते. की बोर्डवर हाताने माहिती टाइप करण्यास वेळ लागतो. हा वेळ वाचविणे शक्य व्हावे, तसेच इंग्लिश भाषा शिकण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी सलग दोन वर्षे संशोधन केले. नवीन काही तरी करावे या उद्देशाने मनात आलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे, असे चैतन्य चोरडिया म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड