शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:55 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी फेरबदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड केली आहे.

ठळक मुद्देया पदासाठी चिंचवडप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या नावाचीही होती चर्चाखासदार श्रीरंग बारणे यांनी योगेश बाबर यांच्या नावाची केली होती शिफारस

पिंपरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी फेरबदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड केली आहे. शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून ही माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी वाकड प्रभागातून तीन नगरसेवक निवडून आणले होते. शहरातून एकूण ९ सदस्य निवडून आल्याने त्यांची वर्णी महापालिकेच्या गटनेतेपदी निवड झाली होती. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. महापालिका निवडणुकीत वाकड परिसरातून अधिक जागा मिळाल्याने कलाटे यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपविली होती. संघटनात्मक काम आणि महापालिकेतील गटनेतेपद अशा दोन्ही जबाबदाऱ्यांना न्याय मिळायला हवा, म्हणून शहरप्रमुखपद अन्य पदाधिकाऱ्यास द्यावे, अशी मागणी कलाटे यांनी पक्षश्रेष्ठींकडे जून महिन्यात केली होती. त्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुखपद कोणाला याबाबत चर्चा रंगली होती. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माजी गटनेत्या सुलभा उबाळे, खासदार श्रीरंग बारणे यांनी योगेश बाबर यांच्या नावाची शिफारस केली होती. या पदासाठी चिंचवडप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या नावाचीही चर्चा होती. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणने ऐकुण घेतले होते. त्यानंतर आता निवड झाली आहे.योगेश बाबर यांच्याकडे पिंपरी विधानसभेचे प्रमुखपद होते. महापालिका निवडणुकीत त्यांची उमेदवारी कापली होती. त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. बंडखोरी केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली होती. माझ्यावरील अन्यायाविरोधात मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे त्यांना शहरप्रमुखपद बहाल करण्यात आले आहे.

माजी खासदार बाबर यांना शह देण्यासाठीबाबर यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे, वडील मधूकर बाबर, चुलते प्रकाश बाबर, चुलती शारदा बाबर यांनी नगरसेवकपद भूषविले असून दुसरे चुलते गजानन बाबर हे शिवसेनेचे आमदार व खासदार राहिले आहेत. बाबर कुटुंबीय हे मूळचे साताऱ्याचे असून पिंपरी-चिंचवडमध्ये राहतात. खासदार बाबर यांनी शिवसेनेला रामराम ठोकून, मनसेमार्गे भाजपाशी सलगी साधल्याने त्यांना शह देण्यासाठी त्यांच्याच बंधूंच्या मुलाला शिवसेनेचे शहरप्रमुख दिले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAnil Desaiअनिल देसाईpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड