शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘वायसीएम’मधील लुटीची चौकशी सुरू, आरोग्य वैद्यकीय अधिका-यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:59 IST

गरिबांना जीवन देणारे रुग्णालय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय असून, या रुग्णालयातील रुग्णसेवेकडे महापालिकेचे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले.

पिंपरी : गरिबांना जीवन देणारे रुग्णालय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय असून, या रुग्णालयातील रुग्णसेवेकडे महापालिकेचे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले. रुग्णांना बाहेरून औषध आणायला लावणे, गोळ्या देण्याच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाइकांची ‘आर्थिक’ लूट केली जात आहे. याची चौकशी प्रशासनाने सुरू केली आहे. रुग्णांची लूट करणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.संत तुकारामनगर येथे वायसीएम रुग्णालय आहे. तेथील रुग्णसेवेकडे महापालिका प्रशासन आणि पदाधिका-यांचे लक्ष नसल्याने सर्वसामान्यांची लूट होत आहे, याबाबतचे स्टिंग आॅपरेशन लोकमतने केले. शिकाऊ डॉक्टरांचा भरणा, प्रशासकीय यंत्रणा नियोजन आणि अंमलबजावणीचा अभाव, जबाबदार व्यक्ती तातडीक विभागात नसणे, रुग्णांना बाहेरून औषध आणायला लावणे, गोळ्या देण्याच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाइकांची ‘आर्थिक’ लूट केली जात असल्याचे पुराव्यासह उघड केले. वायसीएममध्येही रुग्णांची लूट या शीर्षकाखाली सोमवारच्या अंकात वृत्तप्रकाशित केले होते. तातडीक विभागातील अधिकाºयांची केबिन मोकळीच होती. साफसफाईसाठी असणारे कर्मचारी वॉर्डबॉयची कामे करताना दिसले होते.मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत प्रशासनाची तातडीची बैठक घेतली. रुग्णसेवेला कोणी बाधा आणत असेल, तर कारवाई करणार असल्याचेही सांगितले.रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचार करताना डॉक्टरांकडून अडवणूक केली जाते. औषधे उपलब्ध नाहीत, असे कारण दाखविले जाते. औषधे आणि इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेर पाठविले जाते. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांच्या पाकिटावर नॉट फॉर सेल असे लिहिलेले असते. नॉट फॉर सेल असणाºया गोळ्या माथी मारण्याचे काम केले जात आहे. फ्री सॅम्पल गोळीसाठी डॉक्टरांनी शंभर रुपयांची मागणी केली. रुग्णालयात अशा प्रकारची लूट होत असल्याचे उघडकीस आणले होते.संबंधित प्रकाराची दखल वैद्यकीय विभागाने घेतली आहे. हॉस्पिटलची बदनामी करण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल, तर कडक कारवाई केली जाणार आहे. चौकशी सुरू केली आहे.- डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय अधिकारी