शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची शस्त्रक्रिया; अधीक्षकांवर कारवाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 03:32 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका रुग्णाच्या पायावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्यांनतर हलगर्जीपणाचा ठपका ठेवलेल्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना महापालिका आयुक्तांनी ताकीद दिली आहे. यापुढे कर्तव्यात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका रुग्णाच्या पायावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्यांनतर हलगर्जीपणाचा ठपका ठेवलेल्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना महापालिका आयुक्तांनी ताकीद दिली आहे. यापुढे कर्तव्यात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शस्त्रक्रियेचा प्रोटोकॉल त्वरित तयार करावा. त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.संत तुकारामनगर येथे महापालिकेचे यशंवतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. रुग्णालयात बाळासाहेब देडगे या रुग्णाच्या पायावर १६ सप्टेंबर २०१५ रोजी शस्त्रक्रिया केली होती. ही शस्त्रक्रिया चुकीची झाली. तसेच या शस्त्रक्रियेनंतर गँगरिन झाल्याने अवयवछेदन केले. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार, चौकशी समिती नेमली होती. या समितीने २२ मार्च २०१६ ला सादर केलेल्या अहवालात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांनी रुग्णालयप्रमुख म्हणून कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवला. त्यानुसार २१ एप्रिल २०१६ रोजी डॉ. देशमुख यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीत रुग्णालयप्रमुख म्हणून डॉ. देशमुख यांच्या रुग्णालयावर प्रभावी नियंत्रण नसल्याच्या किंवा कर्तव्यात कसूर झाल्याच्या बाबी समोर आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप सिद्ध होत नाहीत, असा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी सादर केला.आरोग्य वैद्यकीय अधिकाºयांनीही दोषारोप सिद्ध होत नसल्याने कारवाई करणे उचित होणार नाही, असा अभिप्राय दिला.त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश जारी केला आहे. त्यामध्ये डॉ. देशमुख यांनी सर्जरी युनिट प्रमुखांची आॅपरेशन लिस्टवर नोटीस आणि स्वाक्षरी नसतानाही मान्यतेविना शस्त्रक्रियेस परवानगी दिली. तसेच रुग्णालय प्रमुख म्हणूनही त्याचे प्रभावी नियंत्रण दिसून येत नाही. शस्त्रक्रियेच्या प्रोटोकॉलचेही त्यांनी पालन केले नाही. त्यामुळे डॉ. देशमुख यांना आयुक्तांनी सक्त ताकीद दिली आहे. शस्त्रक्रियेचा प्रोटोकॉल त्वरित तयार करावा.

टॅग्स :docterडॉक्टरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड