शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवडमधील रावेतला रंगला कुस्त्यांचा आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 13:39 IST

रावेतगावचे ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त तीन दिवस आयोजित विविध कार्यक्रमांना व कुस्तीच्या आखाड्याला चांगला प्रतिसाद लाभला. कुस्त्यांच्या आखाड्याला नामवंत मल्लांनी हजेरी लावली.

ठळक मुद्देतीन दिवस चाललेल्या उत्सवाची सांगता झाली कुस्त्यांच्या आखाड्याने पंचक्रोशीसह जिल्हा व शहरातील शौकिनांनी केली होती मोठी गर्दी

किवळे : रावेतगावचे ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त तीन दिवस आयोजित विविध कार्यक्रमांना व कुस्तीच्या आखाड्याला चांगला प्रतिसाद लाभला. कुस्त्यांच्या आखाड्याला नामवंत मल्लांनी हजेरी लावली. आखाड्यात चमकदार कुस्त्या झाल्याने चांगलीच रंगत आली. तीन दिवस चाललेल्या उत्सवाची सांगता कुस्त्यांच्या आखाड्याने झाली. रावेत येथील महापालिका शाळेजवळ लाल माती टाकून खास बनविलेल्या मैदानात झालेला कुस्त्यांचा आखाडा पाहण्यास पंचक्रोशीसह जिल्हा व शहरातील शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. आखाड्याच्या सर्व बाजूंनी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्याने शौकिनांना कुस्त्या व्यवस्थित पाहता येत होत्या. कुस्त्यांच्या आखाड्याचे पूजन पोलीस पाटील दिवाणजी भोंडवे व माजी नगरसेवक गणेश भोंडवे यांनी केले. माजी सरपंच बाळासाहेब भोंडवे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, उद्योजक राजेंद्र भोंडवे, पोपट भोंडवे, मधुकर भोंडवे आदी उपस्थित होते. शेवटची कुस्ती रहाटणी येथील किशोर नखाते व फुगेवाडी येथील अभिषेक फुगे यांच्यात होऊन ती बरोबरीत सोडविण्यात आली. पंच म्हणून योगेश शिंदे, सचिन भोंडवे, संभाजी भोंडवे, सुनील भोंडवे, बाळकृष्ण भोंडवे, साहेबराव भोंडवे यांनी काम पाहिले. नरेंद्र सोनटक्के, विजय भोंडवे, शांताराम भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले. रावेत ग्रामस्थ मंडळींनी संयोजन केले.

टॅग्स :ravetरावेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड