शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सणाच्या तोंडावर संसार आला उघड्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:39 IST

चिंचवड येथील दळवीनगर परिसरातील झोपडपट्टीला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत सहा झोपड्या खाक झाल्या.

पिंपरी : चिंचवड येथील दळवीनगर परिसरातील झोपडपट्टीला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत सहा झोपड्या खाक झाल्या. मेहनत करून जमवलेले संसारोपयोगी साहित्य ऐन सणासुदीच्या तोंडावर बेचिराख झाल्याने झोपडीधारकांच्या डोळ्यांमधील अश्रू थांबत नव्हते. घरातील सर्वच साहित्य खाक झाल्यामुळे संसार उघड्यावर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.एका झोपडीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने सहा झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यामध्ये घरातील कपड्या-भांड्यापासून सर्वच साहित्य जळाले. दिवाळीसाठी मुला-बाळांसाठी खरेदी केलेले कपडे जळाल्याने आगीत राख झालेल्या साहित्याकडे केविलवाण्या नजरेने पाहण्याची वेळ झोपडीधारकांवर आली आहे. झोपडीतील भांडी, किराणा खाक झाला आहे. डोक्यावरील छप्पर तर नाहीसे झालेच आहे, मात्र फक्त अंगावरील कपडे सोबत असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.आगीत ज्यांची झोपडी जळाली त्या सुनंदा जाधव म्हणाल्या, ‘‘पै पै कमवून ४० हजार रुपये साचवले होते. दोन तोळे सोनं होतं. पण या आगीच्या लोळामध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही. दिवाळीच्या सणासाठी भरलेला किराणा जळून गेला आहे. आग लागली म्हणून आज बघायला व विचारायला सगळे येतील. मात्र, उद्यापासून आम्ही कुणाकडे काय मागणार? आमचा फक्त जीव वाचला आहे. पण आम्हाला जगण्यासाठी आता काहीच शिल्लक राहिलं नाही.’’रमाबाई जाधव म्हणाल्या, ‘‘माझी तीन मुलं, दोन सुना आणि आम्ही दोघं नवरा-बायको या तीन झोपड्यांमध्ये राहत होतो. रात्री अचानक आग लागल्याने घराबाहेर पळालो. आग इतकी मोठी होती, की घरातील काहीच साहित्य बाहेर काढता आलं नाही. घरात ठेवलेलं पैशाचं पाकीट पाह्यलाही मिळालं नाही. घरातील धान्य, बाजार सगळ्याचीच राख झाली.स्थानिक नेत्यांनी अजूनही आमच्याकडं लक्ष दिलं नाही. आमच्या सर्वच जीवनावश्यक वस्तूंची राख झाली आहे.’’>तरुणांच्या तत्परतेने मोठी हानी टळलीपहाटे तीन ते चारच्या सुमारास आग लागल्यानंतर स्थानिक तरुणांनी एकत्र येत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र आग मोठी आहे, ती सहजासहजी विझणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी बाजूच्या झोपड्यांमधील गॅस सिलिंडर झोपड्यांबाहेर काढण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासामध्ये ३० ते ३५ सिलिंडर तरुणांनी रेल्वे रुळाच्या पलीकडे नेऊन ठेवले. त्यामुळे पुढे होणारी हानी टळली.झोपडपट्टी भाग असल्याने अग्निशामक दलाच्या गाड्या आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठा अडथळा येत होता. आग विझवण्यासाठी तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. झोपडपट्टीच्या मागील बाजूने सुमारे पंधरा फूट उंचीची भिंत आहे. त्यावर चढून जवानांनी आग विझवली.