शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जाागतिक संग्रहालय दिन : पिंपरी चिंचवडमधील प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 12:58 IST

चिंचवडच्या संभाजीनगर येथे १९८९ मध्ये प्राणीसंग्रहालयाची पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारणी केली.

ठळक मुद्देनिसर्ग कवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालय : दुसऱ्या टप्प्यातील काम ठप्पनिरीक्षण नोंदविल्यानुसार सस्तन प्राणी येथून हलविण्याचा निर्णय विकास आराखड्यानुसार विस्तारीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होऊन ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित

नारायण बडगुजर पिंपरी : महापालिकेतर्फे चिंचवडच्या संभाजीनगर येथील निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामे मार्गी लागली असली, तरी दुसºया टप्प्यातील कामे रखडली आहेत. कामाची मुदत उलटून सात महिने झाले, तरीही काम ठप्प आहेत. प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी महापालिकेने विकास आराखडा तयार करून तो केंद्र शासनाच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठविला. या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्रहालयाची पाहणी केली. त्यांनी निरीक्षण नोंदविल्यानुसार सस्तन प्राणी येथून हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्पालय आणि पक्ष्यालय म्हणून या उद्यानाचा विकास करण्यास त्यांनी परवानगी दिली. त्यानंतर विकास आराखड्यानुसार विस्तारीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या कामासाठी तरतूदही करण्यात आली. पहिल्या टप्प्यातही स्थापत्यविषयक कामांचा समावेश होता. प्राणिसंग्रहालयासाठी प्रशासकीय इमारत व  कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी खोल्या, अंतर्गत पादचारी मार्ग, स्वच्छतागृह यासह सर्पालय, मगर आणि सूसर यांच्यासह पक्ष्यांसाठी स्वतंत्र कक्ष आदी कामांचा यात समावेश आहे. २०१७ मध्ये ही कामे झाली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होऊन ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने काम रखडले आहे. या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कामाचे आदेश देण्यात आलेले नाहीत. आचारसंहिता संपल्यानंतर त्याबाबत कार्यवाही होईल...........पर्यटकांसह शालेय विद्यार्थ्यांची भेटचिंचवडच्या संभाजीनगर येथे १९८९ मध्ये प्राणीसंग्रहालयाची पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारणी केली. १ जानेवारी १९९० रोजी उद्यान नागरिकांसाठी खुले झाले. सुमारे नऊ एकरातील या उद्यानात चारशे चौरस मीटर हिरवळ, ४६३ झाडे, ६६ सरपटणारे तर १२ सस्तन प्राणी तसेच ६८ पक्षी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी विविध खेळणी होती. विविध प्राणी व पक्षी पाहण्यासाठी पर्यटक आणि शालेय विद्यार्थी या प्राणीसंग्रहालयाला भेट देत.   .......

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड