शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराला खायला लावली विष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 07:08 IST

हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : वीटभट्टीवर काम करणारा कामगार व मालक यांच्यात कामावरुन शाब्दिक वादावादी झाली. यामध्ये मालकाला राग अनावर झाल्याने त्याने कामगाराला चक्क विष्ठा खाण्यास भाग पाडले. मानव जातीला काळिमा फासणारी ही घटना मुळशी तालुक्यातील जांबे येथे घडली. याप्रकरणी संदीप पवार नामक व्यक्तीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कामगाराने फिर्याद दिली आहे.मिळालेली माहिती अशी, फिर्यादी कामगार व त्याचे कुटुंबीय पवार याच्या वीटभाट्टीवर कामाला असून तेथेच रहायला आहे. बुधवारी दुपारी फिर्यादीचे कुटुंबीय वितभट्टीजवळ असताना 'कामाला सुरुवात कर', असे पवार कामगाराला म्हणाला, त्यावेळी कामगार म्हणाला 'आताच जेवण केलंय थोडा वेळातच कामाला सुरुवात करतो'. दरम्यान कामगार असे म्हटल्याने मालकाला राग अनावर झाला. यावरून मालकाने त्याला शिव्या दिल्या. त्यानंतर कामगारनेही मालकाला शिव्या दिल्या. यामुळे संतापलेल्या पवार याने कामगाराला त्याच्या आईचा उल्लेख अश्लीलरित्या करत विष्ठा खाण्यास सांगितले. मात्र, यावर कामगाराने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मालकाने त्याला मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या कामगाराने विष्ठा खाल्ली.