शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्यांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 11:43 IST

चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा मानसिक शारीरिक छळ करून तिला विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचारित्र्याच्या संशयावरुन कल्पना गायकवाड यांचा सासरच्यांकडून शारीरिक, मानसिक छळमृत कल्पनाच्या आईने वाकड पोलिसांत दिली फिर्याद

वाकड : चारित्र्यावर संशय घेऊन दोन वर्षांपासून विवाहितेचा मानसिक शारीरिक छळ करून तिला विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि २७) घडली.कल्पना उर्फ निशा सिद्धार्थ गायकवाड (वय ३०, रा. रमाबाई आंबेडकर कॉलनी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेची नाव असून मृत महिलेच्या आई सुशिला ज्ञानदेव भोसले (वय ५५, रा झफराबाद, जालना) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पती सिद्धार्थ सोमनाथ गायकवाड, सासू पद्मिनी सोमनाथ गायकवाड, सासरा सोमनाथ गायकवाड, दीर श्याम सोमनाथ गायकवाड, जाऊ आशा श्याम गायकवाड (रा. सर्वजण रमाबाई आंबेडकर कॉलनी, वाकड रोड, वाकड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दहा वर्षांपूर्वी कल्पना यांचा सिद्धार्थ याच्याशी विवाह झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पतीसह सासू, सासरे, दीर, जाऊ हे सर्वजण चारित्र्यावर संशय घेऊन कल्पना यांचा मानसिक, शारीरिक छळ करायचे. या छळाला कंटाळून त्यांनी रविवारी विषारी औषध घेतले. हे समजताच सासरच्यांनी एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. दरम्यान आणखी दोन रुग्णालये बदलली, मात्र सोमवारी त्यांचे निधन झाले. त्यांना दोन अपत्य आहेत. मंगळवारी त्यांच्या आईने पोलिसांत धाव घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Arrestअटकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड