शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टमधील बिघाडामुळे ज्येष्ठ महिलेला गमवावा लागला जीव; पिंपळे सौदागर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 17:39 IST

पिंपळे सौदागर येथील श्री साई सोसायटीतील लिफ्टमधील बिघाडामुळे ज्येष्ठ महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. नीलिमा चौधरी (वय ५८) असे मृत महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देमृत महिलेच्या सूनेने सांगवी पोलिसांत दाखल केली तक्रार२३ नोव्हेंबरला लिफ्टमध्ये झालेल्या अपघातात झाला मृत्यू

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील श्री साई सोसायटीतील लिफ्टमधील बिघाडामुळे ज्येष्ठ महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. नीलिमा चौधरी (वय ५८) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी मृत महिलेच्या सूनेनं सांगवी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नीलिमा पिंपळे सौदागर येथे मुलाकडे आल्या होत्या. २३ नोव्हेंबरला लिफ्टमध्ये झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. नीलिमा चौधरी यांचा मुलगा अमित आनंद पिंपळे सौदागर येथील साई श्री सोसायटीमधील सातव्या मजल्यावर राहतात. आपल्या नातवाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नीलिमा रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. २३ नोव्हेंबरला नातेवाईकांसोबत त्या लिफ्टमधून खाली उतरल्या. मात्र, मोबाईल आणि पर्स घरीच राहिल्याचे लक्षात आल्यानंतर त्या पुन्हा घरी आल्या. मोबाईल आणि पर्स घेऊन परत लिफ्टने जात असताना लिफ्टचे बटन दाबले, मात्र लिफ्ट वर आलीच नाही. त्या मजल्यावरील लिफ्टमध्ये शिरण्याचा दरवाजा उघडला. काही कारणामुळे ही गोष्ट नीलिमा यांच्या लक्षात आली नाही आणि त्यांनी लिफ्ट नसलेल्या मोकळ्या जागेत प्रवेश केला. त्यानंतर आत पाऊल टाकताच नीलिमा थेट सातव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर असलेल्या लिफ्टच्या छतावर कोसळल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी त्यांच्या नातेवाईकांची तक्रार आहे. 

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड