शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कचरावेचकांकडे लक्ष देणार का? सुरक्षाविषयक साधने न पुरवल्याने आरोग्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:12 IST

सध्या पिंपरी-चिंचवड शहर कचरा समस्येकरिता सर्व स्तरांमध्ये चर्चेत आहे. स्वच्छ भारत शहर अभियान स्पर्धेमध्ये तळाच्या स्थानी पोहोचण्याचे कारणसुद्धा आता स्पष्ट होत चालले आहे पिंपरी-चिंचवड महापालिका महाराष्ट्र राज्यातील श्रीमंत महापालिका म्हणून संबोधली जाते.

रावेत - सध्या पिंपरी-चिंचवड शहर कचरा समस्येकरिता सर्व स्तरांमध्ये चर्चेत आहे. स्वच्छ भारत शहर अभियान स्पर्धेमध्ये तळाच्या स्थानी पोहोचण्याचे कारणसुद्धा आता स्पष्ट होत चालले आहे पिंपरी-चिंचवड महापालिका महाराष्ट्र राज्यातील श्रीमंत महापालिका म्हणून संबोधली जाते. दररोज ८०० टनापेक्षा जास्त कचरा उचलला जात आहे. परंतु कचरा समस्या आणि कचरावेचकांचेआरोग्य या महत्त्वाच्या शहर पायाभूत विषयांमुळे महापालिका स्वच्छ भारत अभियानामध्ये निकृष्ट कचरा व्यवस्थापनाकरिता समोर आली आहे.पिंपरी-चिंचवड शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे, स्मार्ट सिटी करावयाची असेल, तर स्वच्छता राखणाऱ्या कचरावेचकांच्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शहराची स्वच्छता ठेवण्यामध्ये कचरावेचक महिलांचे योगदान मोठे आहे. परंतु या महिलांना नेमक्या कोणत्या समस्या भेडसावतात याकडे समाजासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कचरावेचक महिला या शहराच्या स्वच्छतेच्या कणा आहेत. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच स्वच्छ पिंपरी-चिंचवड, सुंदर पिंपरी-चिंचवड हे ब्रीद साध्य करता येते. मात्र शहराची सफाई करणाºया या महिला व पुरुषांच्या विविध प्रश्नांकडे काणाडोळा होताना दिसतो. कचरावेचक महिलांच्या समस्यांचा मूलभूत अभ्यास करून हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न प्रशासन दरबारी होताना दिसून येत नाही. स्वच्छ भारत अभियान दूत असलेल्या या महिलांचे शिक्षण अल्प असते. या महिलांना आरोग्याचे वेगवेगळे प्रश्न भेडसावत आहेत. महापालिका प्रभाग आरोग्य विभागाचे ग्राउंड वर्क आरेखन, तसेच प्रत्यक्ष प्रभाग कचरा निर्मूलनाबद्दलचा प्रामाणिक अभ्यास नसल्यामुळे अनेक समस्या शहरात उभ्या राहिल्या आहेत. कचरावेचक व सेवक यांची डम्पिंग ग्राउंडवरील स्थिती दयनीय व विदारक आहे. स्वच्छ भारत/महाराष्ट्र (नागरी) मिशनचे तीन तेरा वाजले आहेत.महापालिका कचºयाबाबतच्या अनेक योजना कागदावर किंवा पालिका सभागृहात बैठका घेऊन राबवीत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तळातील काम प्रामाणिकपणे पार पडत नाही. त्यामुळे कचरावेचकांकरिता अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.कचºयातून भंगारात विकले जाणारे कागद, बाटल्या, लाकूड, लोखंड इत्यादी सामान बाजूला करणारे कचरावेचक शहरातील कचरा व्यवस्थापनाचा भाग आहेत. मात्र आजवर पालिकेकडून त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. उलट व्यवस्थापनात अडचण निर्माण करणारे घटक याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांची अडवणूकही होते.याबाबत कचरावेचकाच्या सद्य:स्थितीवर ‘लोकमत’ने पाहणी केली. त्यामध्ये खालील महत्त्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या. कचरावेचक महिलांकडे साधी तीन मूलभूत आरोग्य सुरक्षा साधने म्हणजेच हातमोजे, अ‍ॅप्रन आणि मास्क आढळले नाहीत. महापालिकेच्या एकाही गाडीमध्ये ओल्या आणि सुक्या कचºयाच्या वर्गीकरणाचे नियोजन नाही.आरोग्य सुविधा : तातडीने मिळण्याची मागणीसर्व प्रभागांतील कचरावेचकांना वायसीएम, थेरगाव,भोसरी,तालेरा सांगवी,आकुर्डी,यमुनानगर,जिजामाता या आठ मोठ्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय मदत मिळू शकेल. याव्यतिरिक्त पालिकेच्या विविध उपकेंद्रेसुद्धा उपयोगात येतील. कचरावेचकांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. अनेक महिला गरजू, गरीब, तसेच वयस्कर आहेत. ठेकेदारी पद्धत अतिशय निकृष्ट आणि अशास्त्रीय असल्यामुळे घातक, तसेच धोकादायक कचरा सदरच्या महिलांकडून हाताळला जात आहे.पुरेशी वैद्यकीय सुविधा साधने, तसेच सुरक्षा साधनांचे वाटप स्वत: महापालिका प्रशासनाने करावे. कचरा ठेकेदार शासनाचे वैद्यकीय सुरक्षासंबंधी असलेले नियम, स्वायत्त संस्था कचरा सुरक्षा धोरण हे काहीही पाळत नाही. सर्वच नियम धाब्यावर बसविलेले आढळले. हे सर्व नियम पाळणे बंधनकारक करावे. प्रत्येक प्रभागाच्या वैद्यकीय अधिकाºयाने कचरावेचक महिलांच्या आरोग्य समस्या गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. त्याकरिता पालिका आयुक्तांनी विशेष धोरण राबविणे आवश्यक आहे. महापालिकेने कचरावेचकांची पुरेशी काळजी घेणे मानवतेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. कचरावेचक आपल्या शहराचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यांना योग्य सुरक्षा मिळणे हाच पाहणीचा उद्देश आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या