शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

धम्मभूमीच्या विकासास गती मिळणार?

By admin | Updated: December 25, 2015 01:41 IST

२५ डिसेंबर १९५४ रोजी येथील बुद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या

देहूरोड : २५ डिसेंबर १९५४ रोजी येथील बुद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ऐतिहासिक घटनेला शुक्रवारी, दि. २५ रोजी ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रथमच सर्वच लोकप्रतिनिधींनी बुद्धविहार विकासकामे करण्यासाठी संरक्षण विभागाकडून परवानगीबाबत सकारात्मक भूमिका घेत पाठपुरावा करण्यात येत असल्याने बुद्धविहाराच्या विकासाची प्रतीक्षा डॉ. बाबासाहेबांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऐतिहासिक बुद्धविहाराचा डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा विस्तार व विकास करण्यात शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सरकारमधील जबाबदार घटकांनी (राज्याचे मंत्री, खासदार, आमदार) धम्मभूमीत येऊन तसे वक्तव्य केल्याने बौद्ध बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, बुद्धविहार कृती समिती व बुद्धविहार ट्रस्ट यांच्यात गेल्या काही दिवसांत होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे समाजबांधवांत संभ्रम निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. येथील बुद्ध मंदिरात डॉ. आंबेडकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची विधिपूर्ण प्रतिष्ठापना २५ डिसेंबर १९५४ रोजी करण्यात आली. १२०० वर्षांनंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान देहूरोडला मिळाला असल्याचे डॉ. आंबेडकर यांनी या वेळी झालेल्या भाषणात नमूद केले होते. या वेळी शंकरराव खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना समारंभाला ४० हजारांहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. स्थानिक कार्यकर्ते दिवंगत लक्ष्मण रोकडे, हरीश चौरे उपस्थित होते. या वेळी डॉ. आंबेडकर यांनी हे जे देऊळ बांधण्यात आले आहे, ते अत्यंत आहे. ते जर आपण आहे, त्या स्थितीत ठेवाल, तर आपल्याला काळिमा लागेल. या देवळाला एक हॉल पाहिजे. प्रदक्षिणा करण्यासाठी जागा हवी आहे. तुम्ही सर्वांनी वर्गणी गोळा करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा. मात्र, भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका, असा सल्ला दिला होता. आजचा प्रसंग इतिहासात नोंदला जाईल. १२०० वर्षांनंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला आहे. याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे, म्हणून धन्यता मानली पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी स्वत: बुद्ध मूर्तीची स्थापना केली असल्याने दर वर्षी राज्यातून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला लाखो बौद्धबांधव येत असतात. वर्षभर भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, या स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या निधीच्या घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीही प्रयत्न केले नव्हते. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत वास्तू निर्माण करण्याचे प्रयत्न दिसत नव्हता. बुद्धविहार व धम्मभूमीचा जीर्णोद्धार व्हावा, धम्मपीठ व्हावे, देशोदेशीच्या बौद्ध उपासकांनी भेट द्यावी आणि धम्मभूमीचे नाव सर्वदूर अजरामर व्हावे असे रोकडे, चौरे व त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत होते. (वार्ताहर)