शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

'आरक्षण घेऊनच येणार...', महिनाभर पुरेल एवढा शिधा घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने

By प्रकाश गायकर | Updated: January 24, 2024 16:51 IST

राज्यातील धाराशीव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत...

पिंपरी : आम्ही वाहनांमधून महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य आणि साहित्य घेऊन निघालो आहे. त्यामध्ये स्वयंपाकासह कपडे, चादरी यांचा समावेश आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घेऊनच वापस येणार असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी केला.

राज्यातील धाराशीव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. एक महिना पुरेल इतक्या अन्नधान्यासोबत आवश्यक वस्तूंचा साठा घेऊन ते मुंबईकडे निघाले आहेत.

त्यामधील अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. आरक्षण नसल्याने मुलांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आता आरक्षण घेऊनच मागे येणार असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. त्यासाठी शेतातील कामे उरकून ते निघाले आहेत. तसेच जी काही थोडी कामे शिल्लक आहेत ती करण्याची जबाबदारी घरातील महिला मंडळींवर सोपवण्यात आली आहेत. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईमध्येच राहणार आहेत. तसेच एक महिन्याचे रेशन संपल्यानंतर गावाकडून त्यांना शिधा पुरवण्यात येणार आहे. त्याबाबतची पूर्वकल्पना गावकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे कितीही दिवस लागले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. 

याबाबत बोलताना विष्णू जा‌धव म्हणाले, “ आम्ही शेतकरी आहे. आमच्याकडे अवघी एक-दोन एकर जमिन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठे आरक्षणापासून वंचित आहेत. मात्र, त्याकडे सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे आता माघार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. 

मनोज जरांगे पाटील यांच्या रुपाने मराठा समाजाला एक प्रामाणिक नेता मिळाला आहे. या नेत्याचे एक वैशिष्ट्य आहे की हा नेता मॅनेज होत नाही. त्यामुळे या नेत्याच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आरक्षण मिळणार याची खात्री आहे. त्यामुळे या नेत्याच्या समर्थनार्थ आम्ही सगळे मुंबईला निघालो आहे. - विश्वंभर पठाडे, मराठा आंदोलक. 

 

माझी दोन मुल घरी आहेत. त्यांनी चांगले शिक्षण घेतले आहे. मात्र, चांगल्या मार्कांनी पास होऊनही त्यांना नोकरी लागली नाही. मला फक्त दोन एकर शेती आहे. ती पण कोरडवाहू आहे. त्यामुळे पुढे दोन मुलांच या शेतीत कसे भागणार हा प्रश्न आहे. माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार. - बाबासाहेब मेंगडे, मराठा आंदोलक 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड