शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याने वाढली जलपर्णी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषणात होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:14 IST

दूषित पाण्यामुळे नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य

- विलास भेगडेतळेगाव दाभाडे : इंद्रायणी नदीपात्रात सांगवी ते इंदोरी या सुमारे १२ किमीच्या टप्प्यात नदीकाठावरील गावांचे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जात असल्याने या भागातील नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे.नदीकाठावर सांगवी, कातवी, वारंगवाडी, आंबी, वराळे, नाणोली तर्फे चाकण, तळेगाव दाभाडे, माळवाडी, इंदोरी ही गावे वसलेली आहेत. यातील बहुतेक गावांतील सांडपाणी नैसर्गिक उतारामुळे सरळ इंद्रायणी नदीपात्रात जात आहे. यामुळे जलपर्णी वाढली असून, डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पावसाळ्यात इंद्रायणी नदीत वाहून येत असलेल्या जलपर्णी, मैलायुक्त सांडपाणी,कचरा यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले असून वेळीच दखल न घेतल्यास इंद्रायणीची गटारगंगा होण्यास वेळ लागणार नाही. तळेगाव स्टेशनसह अनेक गावांचे मैलायुक्त सांडपाणी नदीपात्रात जात असल्याने प्रदूषणात भरच पडली आहे. आंबीसह आंबी एमआयडीसीचे दूषित पाणी इंद्रायणी नदीपात्रात येते.आंबी आणि इंदोरी येथे जनावरे धुण्याचे प्रमाण अधिक आहे. नदीकाठावर महिला मोठ्या प्रमाणावर धुणी-भांडी करताना दिसतात. नदीपात्रात सर्रास जनावरे धुतली जात आहेत. कारखानदारीचे दूषित पाणी, काठावरील गावांचे सांडपाणी, नदीपात्रात सोडल्याने होणारे परिणाम माहिती असूनही या गंभीर बाबीची दखल ग्रामस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाकडूनही घेतली जात नाही. तळेगाव नगर परिषद हद्दीतील मोठया प्रमाणात सांडपाणी ओढ्यामार्गे इंद्रायणी नदीतच येते. शिवाय अंत्यविधीनंतरची राख, निर्माल्य, धुणीभांडी व जनावरे धुणे आदी कारणांनी इंद्रायणी प्रदूषणात भर पडते. अनेक भाविक इंदोरी पुलाजवळ अंत्यविधीनंतरची राख सोडतात. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचे अधिक प्रदूषण झाले आहे.वारंगवाडी ते इंदोरी या टप्प्यातील इंद्रायणीमुळे सुमारे ८० टक्के क्षेत्र बागायती झाले असले, तरी शेतकऱ्यांना नाईलाजाने हे दूषित पाणीच भाजीपाला व बागायती क्षेत्राला द्यावे लागत आहे. नदीकाठावरील बहुतेक गावांचा नळपाणीपुरवठा इंद्रायणी नदीवरच अवलंबून आहे. अनेक ग्राम पंचायतींकडे सक्षम जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडindrayaniइंद्रायणीwater pollutionजल प्रदूषण