शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

महापौरांच्या टँकरसाठी पाणीटंचाई

By admin | Updated: May 28, 2017 03:54 IST

पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी कपातीवरून भाजपा आणि शिवसेनेत जुंपली आहे. आळंदीला पाणी देताना पिंपरी-चिंचवडकरांवर अन्याय का? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. ‘महापौर नितीन काळजे यांच्या पाण्याच्या टँकरसाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे, असा आरोप शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी केला आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचे कारण पुढे करून महापौरांनी दिवसाआड पाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिनाभराचा कालखंड होत आला तरी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पाणीपुरवठा विभागाला कोणीही वाली नसल्याने, वचक नसल्याने त्याचा परिणाम शहरातील नागरिकांवर होत आहे. महापौर आयुक्तांनी बैठक घेऊनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पिंपरी-चिंचवडला पाणी पुरेसे नसताना महापौरांनी आळंदीला पाणी देण्याचा निर्णय घेतला. याबाबत ‘लोकमत’नेही टँकर माफीयांचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी टँकर लॉबीसाठी पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र,महापौरांनी हा आरोप धुडकावून लावला. कोणतीही टँकर लॉबी कार्यरत नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. शहरप्रमुख राहुल कलाटे म्हणाले, ‘‘शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे वास्तव सत्ताधारी आणि प्रशासन मान्य करीत नाहीत. टँकर लॉबीसाठी पाणीटंचाई केली जात आहे. नागरिकांना वेठीस धरणे योग्यनाही. शनिवारी पुणे वेधशाळेने सरासरीच्या शंभर टक्के पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा विचार करता शहरवासीयांवर लादलेली पाणी कपात त्वरित मागे घ्यावी, अन्यथा पुढील आठवड्यात हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करू.’’शिवसेनेचे पदाधिकारी निवडणुकीत झालेला पराजय व नैराश्यातून आरोप केले जात आहेत. उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार आहे. माझे कोठे आणि कोणते टँकर आहेत. हे दाखवून द्यावे. उगाच खोटे आरोप करू नयेत.- नितीन काळजे, महापौर. महापौर नितीन काळजे यांचाच टँकरने पाणी पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्याच्यासाठीच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले जात आहे. आळंदीला पाणी देण्यास विरोध नाही. लोकसभेसाठी हे पाणी दिले जात असेल तर जुन्नर आणि शिरूरपर्यंत पाणी द्यावे. - सुलभा उबाळे, माजी गटनेत्या, शिवसेना