शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

पाणी समस्येच्या तक्रारी, आरोपांनी सत्ताधारी हैराण

By admin | Updated: May 31, 2017 02:21 IST

पाणीटंचाई जाणवू नये म्हणून काटकसरीच्या धोरणानुसार एक दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. मात्र, हा सर्व

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पाणीटंचाई जाणवू नये म्हणून काटकसरीच्या धोरणानुसार एक दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. मात्र, हा सर्व खटाटोप टँकर लॉबीसाठी आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आळंदीला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला, असे आरोप होऊ लागले आहेत. आरोप करण्यापेक्षा ज्या भागात पाणी नाही, त्याबद्दल कळवा, उपाययोजना केली जाईल. पाणी कपात रद्दसाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे महापौर नितीन काळजे, सभागृहनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. शहरात २ मे पासून दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महापौर आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या टँकर लॉबीसाठीच पाणीकपात करीत आहेत, असा थेट आरोप विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे मंगळवारी आयुक्त दालनात पाणीपुरवठा विषयक तातडीची बैठक घेण्यात आली.महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर शैलजा मोरे, सभागृहनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेविका सुमन पवळे, नामदवे ढाके यांच्यासह आयुक्त श्रावण हर्डीकर, सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते. महापौर काळजे म्हणाले, पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागू नये म्हणून २५ टक्के पाणीकपात केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. यापुढील काळात २५ टक्के पाणी कपात कमी करून ती १० टक्यांवर आणली जाईल. ज्या परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे. त्या परिसरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. नळांना विद्युत मोटार लावून उपसा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाचा अंदाज आल्यावर पाणीकपात रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. येत्या आठ दिवसांत आढावा घेणार असल्याचे महापौर काळजे यांनी सांगितले. तक्रारीसाठी हेल्पलाइन, दिवसाआडच पाणीपुरवठा पाणीपुरवठ्याच्या अधिक तक्रारी ज्या प्रभागातून येतील त्या प्रभागातील कनिष्ठ अभियंता, व्हॉल्व्हमन यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विषयक बैठकीत दिले.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, रोज पाणीपुरवठा सुरू असताना ४७० एमएलडी पाणीउपसा केला जातो. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. त्यामुळे पवना धरणातून आता ३९० ते ४०० एमएलडी पाणीउपसा केला जात आहे. या बैठकीनंतर त्यात १० टक्के वाढ केली जाईल. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये घट होईल.नागरिकांनी पाणी पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी ७७२२०६०९९९ या हेल्पलाइन क्रमांकावर कराव्यात. त्याची दखल घेऊन तातडीने निराकरण केले जाईल. जून- जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी दिवसाआडच पाणीपुरवठा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.