शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

जुन्नर शहरातील पाणीप्रश्न पेटला; अधिकारी धारेवर

By admin | Updated: December 10, 2014 23:12 IST

येथील सदाबाजारपेठेतील नागरिकांनी पाणी येत नसल्याची तक्रार केली. जलवाहिनीचे पैसे भरूनसुद्धा अद्याप पाणी का येत नाही, असा सवाल केला.

जुन्नर : येथील सदाबाजारपेठेतील नागरिकांनी पाणी येत नसल्याची तक्रार केली. जलवाहिनीचे पैसे भरूनसुद्धा अद्याप पाणी का येत नाही, असा सवाल केला. याच प्रश्नावर नगराध्यक्षा राणी शेळकंदे व मुख्याधिकारी वारुळे यांना नगरसेविकांनी धारेवर धरले. त्यामुळे सभागृहात वातावरण तापले होते.
नगराध्यक्षा राणी शेळकंदे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वारुळे यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण 39 विषय होते. त्यांतील जुन्नर नगर परिषदेच्या व्यापारी संकुल फेज 3चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाचे 12 गाळे व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलामधील 34 गाळे यांच्या अनुसूचित जाती-जमाती व इतर तसेच  अंध, अपंग यांच्यासाठी राखीव गाळ्यांच्या सोडतीसाठी काही शालेय विद्यार्थी बोलवून सोडत 
काढण्यात आली. 
ही सोडत प्रक्रिया पारदर्शी व्हावी म्हणून व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलामधील लोअर गाळ्यांमधील 3 नंबर गाळा व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलामधील गाळा नं. 24  व 25 हे अनुसूचित जाती-जमाती व इतरसाठी राखीव झाले, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलामधील गाळा नं. 16 अपर अंध अपंगांसाठी राखीव झाला.
याआधी वरील व्यापारी संकुल फेज 3 चे गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया ही बोगस झाल्याचा आरोप करीत शिवसेनेचे गटनेते मधुकर काजळे यांनी उच्च न्यायालयात 
याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने फेरलिलाव करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे 
सोडत काढण्याचा निर्णय 
घेण्यात आला.                (वार्ताहर)
 
4जुन्नर नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच विषेशसभेसाठी नागरिकांनी केलेल्या अर्जास मान्यता देऊन एकूण 11 जणांना विशेष सभेत बसण्याची परवानगी नगराध्यक्षा राणी शेळकंदे यांनी दिली.
4नागरिकांनी विशेष सभेत बसण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी उपनगराध्यक्षा माधुरी जोगळेकर यांनी पुढाकार घेतला; परंतु ज्या वेळी नगराध्यक्षा राणी शेळकंदे यांनी नागरिकांना केवळ एकाच प्रशनांसाठी बसवण्यात येईल, असे सांगितले, तेव्हा उपनगराध्यक्षा माधुरी जोगळेकर यांनी नगराध्यक्षांना ठणकावून सांगितले, की तुम्ही नागरिकांना पूर्ण 39 विषयांसाठी परवानगी द्यावी, तसे न केल्यास मी सभात्याग करेन. जर आपल्याला स्वच्छ व पारदर्र्शी कारभार करायचा आहे, तर विशेष सभेत नागरिकांना बसवल्याने काय फरक पडणार आहे? असा उलट सवालही त्यांनी नगराध्यक्षांना केला. 
4लगेचच नगराध्यक्षा राणी शेळकंदे यांनी उपनगराध्यक्षा जोगळेकर यांचे म्हणणो 
मान्य करीत नागरिकांना संपूर्ण सभेत बसण्याची परवानगी दिली. 
 
4 भाई कोतवाल चैक येथील सांस्कृतिक भवनाच्या विषय क्रमांक 22 वरून बराच गदारोळ झाल्याचे पाहावयास मिळाले त्या विषयाला सत्ताधारी पक्षाच्या माजी नगराध्यक्षा भारती मेहेर, किशोरी होगे, वैष्णवी चतुर, जया बावबंदे, उपनगराध्यक्षा माधुरी जोगळेकर व इतर एक यांनी विरोध केला; परंतु सदर ठरावास उपसूचना न मांडण्यात आल्याने व इतर नगरसेवकांनी सूचना मांडून अनुमोदन दिल्याने सदरचा विषय मंजूर करण्यात आला. 
 
4 जुन्नर नगर परिषदेच्या विशेष सभेत नागरिकांना बसण्याची परवानगी देण्यात येत नव्हती. मात्र, याबाबत उपनगराध्यक्षा माधुरी जोगळेकर यांनी आग्रह धरल्याने नगराध्यक्षांना ही परवानगी द्यावी लागली. त्यामुळे 11 नागरिकांना प्रथमच विशेष सभेचे कामकाज पाहता आले आणि आपण निवडून दिलेला नगरसेवक आपली विकासकामे मंजूर करून घेण्यासाठी काय करतो, हेही नागरिकांना दिसून आले. काही ठिकाणी नगरसेवकांचा बेगडीपणाही दिसून आला.
 
4ज्या नागरिकांना विशेष सभेत बसण्याची परवानगी देण्यात आली त्यांत ज्ञानेश्वर होगे, सोमनाथ काजळे, साजीद पठाण, अमजद कागदी, मुजमील पिंजारी, रऊफ खान घडीआली, नितीन गुजराती, वैभव मलठनकर, समीर आतार, गणोश पुरवंत आदी 11 नागरिकांनी विशेष सभेत बसण्याची परवानगी नगराध्यक्षा राणी शेळकांदे यांच्याकडे मागितली होती. 
 
4 नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील प्रश्न उपस्थित करण्यासाठी नागरिकांनी निवडून दिले आहे, ते काही नगरसेवक सभेच्या दिवशी मूग गिळून गप्प बसलेले असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी त्यांच्या प्रभागातील काही प्रश्नांसाठी चर्चेतसुद्धा सहभाग घेतला नाही. 
 
4 जे काही मुरब्बी नगरसेवक आहेत, ते त्यांचे विषय मंजूर करून घेण्यासाठी जिवाचे रान करून आरडाओरडा करताना दिसले, तर काही सत्ताधारी आणि विरोधी नगरसेकांची काही विषय मंजूर अथवा नामंजूर करून घेण्यासाठी हुज्जत जरी झाली असली, तरी ती हुज्जत बेगडी व ढोंगी असल्याचे स्पष्ट जाणवत होते, अशी प्रतिक्रिया सभेला उपस्थित असणा:या काही नागरिकांनी दिली. 
 
4जुन्नर नगर परिषदेच्या राजकारणात काही सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांचे आलबेल असून, स्वत:ची 
पोळी भाजून घेण्यासाठी वाटेल ते तह करण्याची त्यांची तयारी असल्याचे समोर आले आहे.