शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया करूनही पाणी दूषितच

By admin | Updated: March 22, 2017 03:07 IST

पुणे महानगरपालिकेने मुळा-मुठा नदीतील मलजल व रसायनयुक्त व सांडपाण्यावर प्रक्रिया करून जुन्या मुठा उजव्या कालव्यात

पुणे : पुणे महानगरपालिकेने मुळा-मुठा नदीतील मलजल व रसायनयुक्त व सांडपाण्यावर प्रक्रिया करून जुन्या मुठा उजव्या कालव्यात सोडल्याचा दावा वारंवार केला आहे. परंतु, आजही नदीतील पाण्यावर सुमारे चार ते सहा फूट केमिकलयुक्त फेसाचा डोंगर दिसत आहे. या केमिकलयुक्त पाण्यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हेच पाणी महानगरपालिकेने प्रक्रिया करून ते कालव्यात सोडले आहे का, असा प्रश्न लोणी काळभोर येथील स्थानिकांनी उपस्थित केला आहे. पुणे शहराला जादा पाण्याची आवश्यकता होती, त्या वेळी पाणी घेतल्यानंतर तयार झालेले सांडपाणी प्रक्रिया करून, ते जुन्या कालव्याद्वारे शेतीस पुरवावे, अशी अट घालण्यात आली होती. १९९७ मध्ये हा करार झाला. गरजेएवढे पाणी उचलले गेले. परंतु, मुंढवा येथे पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी कालव्यात सोडण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च करून जॅकवेल प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. परंतु, नदीतील पाण्यावर येत असलेला फेस पाहता या पाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करणे पुणे महानगरपालिकेस शक्य झालेले नाही ही बाब सिद्ध होते.मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी हवेली व दौंड तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतीस यापुढे बारमाही पाणी मिळणार, या कल्पनेने तर मुळा - मुठा नदीचे पाण्यावर अवलंबून असलेले थेट सोलापूरपर्यंतचे नागरिक व शेतकरी मुळा-मुठा नदी कायमस्वरूपी प्रदूषणातून मुक्त होणार म्हणून सुखावले होते. २६ डिसेंबर २०१६ रोजी महानगरपालिकेने नदीतील पाणी कालव्यात सोडण्यास सुरुवात केली. हे पाणी प्रक्रिया न करता जसेच्या तसे सोडण्यात आल्याने हे मलजल व पाणी पाहून सर्वांचा भ्रमनिरास झाला.(प्रतिनिधी)