शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस, सरकार काय तोडगा काढणार?
3
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
4
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
5
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
6
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
7
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
8
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
9
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
10
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
11
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
12
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
13
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
14
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
15
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
16
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
17
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
18
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
19
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
20
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

एप्रिलमध्ये दिवसाआड पाणी?

By admin | Updated: March 18, 2017 04:49 IST

उन्हाळा सुरू झाला असून, पवना धरणातील सद्य:स्थिती पाहता ५१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. एप्रिल महिन्यात दिवसाआड

पिंपरी : उन्हाळा सुरू झाला असून, पवना धरणातील सद्य:स्थिती पाहता ५१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. एप्रिल महिन्यात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात धरणातील साठा आणि पुरवठा यांचा आढावा घेण्यासाठी पाटबंधारे विभाग व महापालिका अधिकारी यांची लवकरच बैठक होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडून रावेत येथील जलउपसा केंद्रातून हे पाणी उचलले जाते. ते पाणी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागांतील नागरिकांना पुरविले जाते. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यातच पवना धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध पाणीयोजना, तळेगाव, उर्से, वडगाव मावळ या भागातील पाणीयोजनांना वर्षभर पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे पाटबंधारे विभागाने सूचित केले होते. पवना धरणातून वीजनिर्मिती आणि पिंपरी-चिंचवडला पिण्यासाठी दिवसाला ४५० एमएलडी पाणी सोडले जाते. पवना धरणाची एकूण क्षमता १० टीएमसी आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, ‘‘या धरणात आजअखेर ५१ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यानच्या कालखंडात धरण १०० टक्के भरल्याने दिवसाआड पाण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर दिवसातून एकवेळ पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले होते. त्यामुळे सध्या शहरात एकवेळ पाणीपुरवठा आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. पाणीसाठा कमी झाल्यास जलसंपदा विभागाच्या वतीने महापालिकेला सूचना केली जाते. पाणी पुरवठ्यासंदर्भात पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला जाणार आहे. महिनाभरात या संदर्भात आढावा घेण्यात येणार असून, तसेच महापालिकेतील महापौर, उपमहापौर, विविध पक्षांचे गटनेते यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतरच पाणीकपातीचा निर्णय होईल. ही बैठक महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत होईल. पाण्याचे आपत्कालीन नियोजन पवना धरणातील पाणीसाठा हा जून अखेरपर्यंत पुरणार आहे. मात्र, याबाबत पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली जाईल. धरणातील पाणीसाठा आणि पावसाचा अंदाज घेऊन, साठा किती दिवस पुरेल याचा आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेतला जाईल. पाण्याचे आपत्कालीन नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)जूनअखेरपर्यंत पुरेल इतका साठापवनानगर : पवना धरणात ५१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून जूनअखेरपर्यंत पाण्याची चिंता नाही. पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणात या वर्षी समाधानकारक साठा शिल्लक आहे. धरणाची साठवण क्षमता १० टीएमसी असून पाच टीएमसी पाणी शिल्लक आहे. पाणी पातळी ६०७ मीटर इतकी असून, १२३ मीटर इतका उपयुक्त साठा आहे. तर मागील वर्षी १६ मार्चअखेर ३९% पाणी साठा शिल्लक होता. त्या तुलनेत १२% इतका पाणी साठा जादा आहे. धरणातून दररोज १२०० क्युसेकने ७ तास पाणी विसर्ग केला जात आहे. या वर्षी २४१८ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. त्यामुळे धरण १००% भरले होते, तर गतवर्षी ते ८०% भरले होते. (वार्ताहर)धरणात ५१ % इतका पाणी साठा शिल्लक असला तरी पाण्याची काटकसर करण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे शिवाय पुढे पाऊस कधी येईल, किती पाऊस पडेल या बाबत नक्की काही सांगता येणार नाही. त्यामुळे महापालिका व पाटबंधारे विभागाला आपत्कालीन नियोजन करावे लागणार आहे. तसेच नागरिकांनी काटकसर करून पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. - मनोहर खाडे, शाखा अभियंता