शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावरील खड्डे चुकवताना वारकऱ्यांची होतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:20 IST

कार्तिकी एकादशीनिमित्त देहू-आळंदीला येणाऱ्या भाविकांना व वाहनचालकांना देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावर खड्डे चुकविताना कसरत करावी लागली.

ठळक मुद्देपावसाळ्यात पडलेल्या लहानमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणकॅन्टोन्मेंटचे काही पथदिवे बंद असल्याने खड्डे चुकविताना वाहने आदळून बंद पडल्याचे प्रकार

देहूरोड : देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावर देहूरोड लष्करी हद्दीत अशोकनगर-चिंचोलीपासून ते झेंडेमळा दरम्यानच्या रस्त्यावर पावसाळ्यात पडलेल्या लहानमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त देहू-आळंदीला येणाऱ्या भाविकांना व वाहनचालकांना खड्डे चुकविताना कसरत करावी लागली. यासह  कॅन्टोन्मेंटचे काही पथदिवे बंद असल्याने खड्डे चुकविताना वाहने आदळून वाहने बंद पडल्याचे प्रकार घडत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यावर  लहान मोठे खड्डे पडले असून, संपूर्ण चार महिन्यांच्या काळात एकही खड्डा दुरुस्त करण्यात आलेला नाही.  या रस्त्यावरून तळवडे आयटी पार्ककडे ये-जा करणारी अभियंत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या  मोटारी, चाकण एमआयडीसीकडे ये-जा करणारी वाहने, पंचक्रोशीतील वाहनांची तसेच देहूगाव येथे संत तुकाराम महाराजांच्या व ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची वर्दळ असतानाही कार्तिकी वारीपूर्वी प्रशासनाने खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष  केले.

 

चिंचोलीत सर्वाधिक खड्डेचिंचोली गावाजवळ सर्वाधिक खड्डे पडले असून, या रस्त्यावर वाहनांची सार्वधिक वर्दळ असल्याने रस्त्यावरील खड्डे चुकविणे अनेकदा शक्य होत नाही. वाहनचालकांना नाईलाजास्तव खड्ड्यात वाहने घालावी लागत असून, त्यामुळे वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. मंगळवारी सकाळपासून दोन मोटारी व एक पीएमपी बस बंद पडल्याचे दिसून आले. रस्त्यावरील खड्ड्यांची लांबी, रुंदी वाढत चालली असून, खड्डे खोलगट व पसरट होत चालले आहेत. चारचाकी वाहने खड्डे चुकविताना थेट अंगावर येत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

टॅग्स :dehuदेहूroad safetyरस्ते सुरक्षा