शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

वाकड, हिंंजवडी परिसर असुरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 06:40 IST

शहरातील वाकड, हिंजवडी परिसर असुरक्षित बनला आहे. आयटी क्षेत्रामुळे या भागात मध्यरात्रीही मोठी वर्दळ असते. गस्तीवर पोलीस नावालाच असतात.

पिंपरी : शहरातील वाकड, हिंजवडी परिसर असुरक्षित बनला आहे. आयटी क्षेत्रामुळे या भागात मध्यरात्रीही मोठी वर्दळ असते. गस्तीवर पोलीस नावालाच असतात. प्रत्यक्षात बहुतांश पोलीस गस्त घालत असल्याचे दाखवत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या टपºया, हातगाडीवाल्यांकडून हप्ते गोळा करताना दिसून आले. रात्री, अपरात्री फिरणाºया तरुण-तरुणींच्या दृष्टीने तेथील परिस्थिती असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. गस्तीवरील पोलीस संशयित व्यक्ती, मोटारी याकडे लक्ष न देता, केवळ हॉटेलवाल्यांकडे चकरा मारत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने रात्रीच्या वेळेत केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून समोर आले.पोलिसांचा वरदहस्त;नियम धाब्यावररहाटणी चौकातील व परिसरातील पान शॉप, काही अंतरावरील चायनीज सेंटर अगदी मध्यरात्री दिमाखात सुरू होते. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होती. अगदी पिंपळे सौदागर पोलीस चौकीच्या समोर हॉटेल सुरू होते, तर थोडे पुढे देवी आई माता दत्त मंदिराच्या जवळील काही पान शॉप सुरूहोते. रात्री ११.३० वाजता पोलीस वगैरे कोणी येत नाही का, असे विचारले असता पोलीस काही करत नसल्याचे हॉटेलचालकांनी ठामपणे सांगितले. वाकड पुलाच्या बाजूने ताथवडे रस्त्याने पुढे गेल्यानंतर तेथे मात्र पोलीस कोठेच दिसून आले नाहीत. ताथवडे सर्व्हिस रस्त्याने पुढे जाऊन बोगद्यातून बाहेर पडून पुन्हा वाकडच्या दिशेने गेल्यानंतर तेथेही पोलीस कर्मचारी दिसून आला नाही. काही अंतर पुढे आल्यानंतर मात्र कानाला टोपी आणि स्वेटर घातलेले दोन पोलीस कर्मचारी दुचाकीवरून येताना दिसले.हिंजवडी आयटी पार्क ते वाकड आणि ताथवडे मार्गावर आयटी कंपन्यांमध्ये काम करणाºया कर्मचाºयांना ने-आण करणाºया वाहनांची वर्दळ असते. तसेच वाकड येथून मुंबई-बंगळुरू महामार्ग जातो. या मार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणारे, तसेच मुंबई-बंगळुरू मार्गाने सातारा, कोल्हापूर, सांगलीकडे जाणारे प्रवासी वाकड येथे वाहनाची प्रतीक्षा करीत थांबलेले असतात. वाकड ते देहूरोड, किवळे, लोणावळादरम्यान, तसेच वाकड ते बावधन या अंतरापर्यंत रात्री प्रवाशांची लुबाडणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे यापूर्वीच निदर्शनास आले आहे. कधी प्रवासी म्हणून वाहनात बसून पुढे काही अंतर गेल्यानंतर वाहनचालकालाच लुबाडणाºया भामट्यांचा या मार्गावर वावर वाढलेला आहे. कधी मोटार उभी करून प्रवाशांची प्रतीक्षा करीत असल्याचे भासवून मोटारीत बसणाºया प्रवाशांची लुबाडणूक केल्याच्या घटना या मार्गावर घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमत टीमने बुधवारी रात्री १२ ते पहाटे चार या कालावधीत स्टिंग आॅपरेशन केले.बीट मार्शल गायबशिवार चौकात रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू होत्या. सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत रात्री व्यवसाय करणाºयांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. या परिसरात पोलिसांचा रात्री पहारा फार कडक असतो. मार्शल, टु मोबाइल ही वाहने ठिकठिकाणी पूर्वी दिसून येत असत.मात्र सध्या ते दिसून येत नसल्यानेच रात्री ११ नंतर अनेक हॉटेल, पान टपºया, चहा टपºया बिनधास्त सुरू असल्याचे चित्र दिसून येत होते.रात्रभर टपºया, स्टॉल खुलेभूमकर चौकात मुंबई-बंगळूर महामार्गावर चहा व खाद्यपदार्थांच्या चार गाड्या आहेत. त्या रात्रभर सुरू असतात. त्या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी असते. दुचाकी,चारचाकी, ट्रक, बस या ठिकाणी चहा-नाश्त्यासाठी थांबतात. मध्यरात्री दुचाकीवरून दोन पोलीस कर्मचारी आले. एकेक करून सर्वच टपरीवर जाऊन टपरीचालकांशी काही तरी बोलून जात होते. त्यांनी वाकड जकातनाका चौकातील टपरीवर चहा घेतला व त्याच्याशीही काही तरी बोलून निघून गेले. याचा अर्थ असा, की या व्यवसायाला पोलिसांचा छुपा पाठिंबा आहे.मद्यधुंद तरूणांचा रात्रभर वावरवाकड पुलाजवळ थांबल्यानंतर तेथे खासगी प्रवासी भाडेवाहतूक करणारी वाहने थांबली होती. दोन-तीन मोटारी प्रवासी वाहतूक करणाºया नव्हत्या. या मोटारीत बसलेले तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. ही मोटार पुलाजवळ थांबली होती. रात्री एकच्या सुमारासही मोटार तेथेच थांबून होती. तरुणांच्या संशयास्पद हालचाली पहावयास मिळत होत्या. त्या ठिकाणी रात्री दीड वाजेपर्यंत थांबलो, तरीही एक टपरी खुली होती.त्या ठिकाणी, चहा, नाष्टा असे खाद्यपदार्थ तसेच सिगारेट, तंबाखूची विक्री होत होती. साई चौकात वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक बिअरबार सुरू होता. तेथील एकाने सांगितले की हा बार २४ तास सुरू असतो. याच रस्त्यावरून हिंजवडीकडे जाणारे-येणारे चाकरमाने रात्रभर येत-जात होते. येथे अनेक वेळा रात्री भांडणाचे प्रकार घडले आहेत. वाकड पोलीस यापासून काहीच धडा घेत नाहीत.संवाद हप्ता वसुलीचा!स्वेटर परिधान करून आलेले दोन पोलीस कर्मचारी टपरीवजा हॉटेलजवळ आले. त्यांनी हॉटेल मालकाला बाहेर बोलावले. बाजूला घेऊन ते त्याच्याशी बोलू लागले. परंतु आर्थिक देवाणघेवाणीचा त्यांचा संवाद असल्याचे काही शब्द कानी पडत होते. रोज प्रत्येक टपरीधारकाकडून पोलीस २०० रूपये घेऊन जात असल्याचे टपरीचालक दबक्या आवाजात ग्राहकास सांगत होते.परमिट रूमचोवीस तास खुलेवाकड परिसरातील परमिट रूम चोवीस तास खुले असल्याचा फलक दिसून आला. पहाटे तीनची वेळ असतानाही बाहेरच पानटपरीजवळ एक तरुण काय हवे ते मिळेल, २४ तास परमिट रूम खुले आहे, असे येणाºया प्रत्येकाला सांगत होता. थोडे जवळ जाऊन पाहिले, तर रात्री तीन सव्वा तीनच्या सुमारासही परमिट रूममध्ये गर्दी होती. मागाल ते देऊ अशा स्वरूपात तेथील तरुण या हॉटेलची जाहिरात करीत असल्याने आश्चर्याचा धक्का बसला. शहरात अन्य ठिकाणी बारानंतर कोठेही परमिट रूम खुले दिसून येत नाही. शहरातील टपरी १२ नंतर खुली दिसली तर पोलीस टपरीचालकाला हटकतात. त्या ठिकाणी मात्र पहाटे साडेतीन-चार वाजेपर्यंत ग्राहकांना सेवा पुरविली जात असल्याचे पहावयास मिळाले.पहाटे चारला पिंपळे सौदागर पोलीस चौकीत एकही अधिकारी किंवा कर्मचारी हजर नव्हता. चौकीचे दार अर्धे उघडे होते. मात्र पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरात रात्रभर गस्तीवरचा एकही पोलीस आढळून आला नाही. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा रामभरोसे व अवैध धंद्यांना अभय अशी परिस्थिती सध्या शहरात आढळून आली.आयटीतून रात्री उशिरा सुटी झालेले तरुण, तरुणी वाकड मार्गावर रात्री दोन-तीन वाजताही दिसून आले. खुली टपरी दिसेल, हॉटेल अशा ठिकाणी ते थांबत होते. गस्तीवरील पोलिसांनी उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलांवर कारवाई करणे अपेक्षित होते. पोलीस मात्र या हॉटेलजवळ थांबून हॉटेलचालकांशी काही तरी हितगूज करीत असल्याचे दिसून येत होते. ते कोणालाही हटकत नव्हते, आर्थिक देवाण घेवाणीचा त्यांचा विषय असल्याचे सहज लक्षात येत होते.