शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघाताची प्रशासन पाहतेय वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 02:52 IST

टाकवे : इंद्रायणी नदीवरील पुलाचे कठडे तुटूनही दुर्लक्ष

वडगाव मावळ : टाकवे येथील इंद्रायणी नदीवरील पुलाला आठ दिवसांपूर्वी वाहनाची धडक बसल्याने पुलाचे कठडे तुटले आहेत. या पुलावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. दुरुस्ती न केल्याने पुन्हा अपघात होऊ शकतो. प्रशासन भीषण अपघात होण्याचीच वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. बांधकाम खात्याने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बनला आहे. कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो. या बाबींचा विचार करून या पुलाची दुरुस्ती करावी किंवा नवीन पूल तातडीने उभारावा, अशी मागणी सेवा फाउंडेशनचे चंद्रकांत असवले, किरण भांगरे, तानाजी मोरे, मधू कोकाटे, संतोष जांभूळकर यांनी सहा महिन्यांपूर्वी बांधकाम खात्याकडे केली होती. त्यानंतर बांधकाम खात्याने काही दिवस तुटलेल्या ठिकाणी लाल कापड गुंडाळले होते. नंतर लोखंडी अ‍ॅँगल लावले. आठ दिवसांपूर्वी एका जीपचा ब्रेक फेल झाल्याने ती कठड्याला धडकली. नदीपात्रात पडता पडता वाचली. त्यामुळे पुन्हा पाइप तुटले आहे. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात हा पूल धोकादायक असल्याची नोंद केली आहे. तरीदेखील दुरुस्तीसाठी किंवा नव्या पुलाच्या बांधकामासाठी अद्याप शासनाला जाग आली नाही. पूल कोसळल्यावर शासनाला जाग येणार का, असा सवाल फाउंडेशनच्या सदस्यांनी केला आहे. सावित्री नदी दुर्घटनेनंतर झालेल्या सर्वेक्षणात सर्वात अगोदर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे घोषित केले होते. त्याच सुमारास काही दिवस अवजड वाहतूक बंद केली होती. ती पुन्हा सुरू झाली आहे. या पुलावर रात्री अंधार असतो. त्यामुळे अपघात होऊन मोठी दुर्घटना घडू शकतो. त्यासाठी पुलावर पथदिवे बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे प्रशासन कधी लक्ष देणार हे गुलदस्त्यातच आहे.माहितीचा अधिकार : निधी मंजूर नाहीपुलाच्या दुरुस्तीसाठी अगर नवीन पुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून किती निधी मंजूर झाला आहे, याबाबत सेवा फाउंडेशनचे चंद्रकांत असवले यांनी माहितीच्या आधाराखाली माहिती मागवली असता, कोणताही निधी मंजूर नसल्याचे बांधकाम खात्याने कळविले आहे. या पुलावर रात्री अंधार असतो. त्यामुळे अपघात होऊन मोठी दुर्घटना घडू शकतो. त्यासाठी पुलावर पथदिवे बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड